चार्जिंग फवारणी पंप, वॉटर फिल्टर वाटपास प्रारंभ

निलंगा : प्रतिनिधी
शेतीतील वाढता उत्पादन खर्च कमी करून शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञानाची साधने माफक दरात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने माजी मंत्री तथा माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विशेष सहकार्याने आणि युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून चार्जिंग बॅटरी फवारणी पंप व वॉटर फिल्टर वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
अध्यक्षस्थानी राजवीर संभाजीराव पाटील निलंगेकर हे होते. लातूर जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई पाटील तळेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते मंगलबाई बिरादार, बंडू लव्हे, शिवाजी नाईकवाडे, तात्याराव पाटील व लक्ष्मण वाडीकर या पाच शेतक-यांना प्रातिनिधीक स्वरूपात फवारणी पंपाचे वितरण करून उपक्रमास सुरुवात झाली. हा उपक्रम पुढील आठ दिवस सुरू राहणार आहे. यावेळी उषाताई पाटील तळेगावकर यांनी शेतक-यांना आधुनिक शेतीची साधने परवडणा-या दरात उपलब्ध करून देणारा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उत्पादनवाढीस चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नेप्च्यून फवारा कंपनीचे व्यवस्थापक प्रज्वल देशमुख यांनी फवारणी पंपाच्या वापराबाबत मार्गदर्शन केले. पूर्ण चार्ज केल्यानंतर ३५ ते ४० टाक्यांची फवारणी करता येते. तसेच बॅटरी व मोटारीत सहा महिन्यांत तांत्रिक दोष आढळल्यास संबंधित भाग बदलून देण्याची सुविधा असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमास व्यंकटराव धुमाळ, पंचायत समिती सभापती सुनिता वाघमारे, संजय सूर्यवंशी, अंकिता पाटील, नगराध्यक्ष संजयराज हालगरकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांच्यासह विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक संजय दोरवे यांनी केले तर सूत्रसंचालन शेषेराव ममाळे यांनी केले. निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी तालुक्यातील शेतक-यांनी उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news