Homeलातूरज्ञान मोती सरोवर आध्यात्मिक केंद्रात ५५ फुटी शिवलिंग 

ज्ञान मोती सरोवर आध्यात्मिक केंद्रात ५५ फुटी शिवलिंग 

लातूर : प्रतिनिधी
लातूर-औसा रोडवरील पेठ येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातूर उपकेंद्राजवळ बसवेश्वरनगरमध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारीजचे ज्ञान मोती सरोवर आध्यत्मिक केंद्र उभे राहात आहे. या आध्यत्मिक केंद्रात ५५ फुटाचे शिवलिंग असणार आहे. शिवाय ईश्वरी सेवेसाठी विविध सेवा, सुविधा असणार आहेत.  ज्ञान मोती सरोवर आध्यात्मिक केंद्र नागरिकांना ईश्वरीय ज्ञान, दैवी गुण आणि आत्मिक शांतीची अनुभूती देण्यासाठी समर्पित आहे. या ठिकाणी तब्बल ५५ फुटाचे उंच, भव्य शिवलिंग उभारण्यात येत आहे. येथे ध्यान केल्याने मनाला शांती आणि संकल्पांना बळ मिळणार आहे. त्यासोबतच स्वर्णिम भारतचा संदेश देणारे स्पिरिचुअल म्यझियम ध्यानासाठी विशे मेडिटेशन हॉल आणि आत्मदर्शन घडवणारा ३६० डिग्री राजयोग मेडिटेशन डोम या केंद्राची प्रमुख आकर्षणे  आहेत.
प्रजापिता ब्रह्माकुमारीज ही महिलांद्वारे चालवली जाणारी जगातील सर्वात मोठी आध्यात्मिक संस्था आहे. ती १३० पेक्षा अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. लातूरच्या या ज्ञान मोती सरोवर आध्यात्मिक केंद्रात ईश्वरीय पालना आणि आध्यत्मिक सूखाची अनुभूती घेण्यासाठी सुमारे ५० निवासी साधकांची राहण्याची उत्तम सुविधाही उपलब्ध करुन दिली जाणार आहे.  ज्ञान मोरी सरोवर या आध्यत्मिक केंद्रात नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी राजयोग मेडिटेशन कोर्स, तणाव मुक्ती, व्यसन मुक्ती आणि स्व-सशक्तीकरण यासारखे विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत. तसेच आजच्या जीवनशैलीनूसार डिजिटल वेलनेस कॉर्पोरेट वेलनेस, सकारात्मक दृष्टीकोन आणि महिला सक्षमीकरणावरही विशेष मार्गदर्शन दिले जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR