15.2 C
Latur
Wednesday, November 12, 2025
Homeआरोग्यएमबीबीएस प्रवेशाचे रॅकेट; १५१ विद्यार्थी बंदी फे-यात

एमबीबीएस प्रवेशाचे रॅकेट; १५१ विद्यार्थी बंदी फे-यात

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात मेडिकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे मोठे रॅकेट समोर आले आहे. परराज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी बनावट ई-मेल, दूरध्वनी क्रमांक आणि अधिवास प्रमाणपत्राच्या आधारे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) राबविल्या जाणा-या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या तिस-या फेरीसाठी प्रवेश अर्ज भरल्याचे समोर आले.
हा प्रकार समोर आल्यानंतर सीईटी सेलने या विद्यार्थ्यांना त्यांची मूळ कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. त्यात एकाच विद्यार्थ्याने कागदपत्रे सादर केली आहेत. त्यामुळे सीईटी सेलकडून आता उर्वरित १५१ विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या पुढील फे-यांमध्ये समाविष्ट होण्यास बंदी घातली जाणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार असून, त्याची माहिती मेडिकल कॉन्सिलिंग समितीकडे मागितली आहे.
प्रमाणपत्रेही बनावट : विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या डोमीसाईल प्रमाणपत्रावर दुसरीच नावे असणे, राज्य सरकारकडून दिल्या जाणा-या प्रमाणपत्राच्या फॉरमॅटमध्ये अथवा त्या अक्षरांप्रमाणे प्रमाणपत्र नसणे, तसेच प्रमाणपत्राचा अर्धाच भाग दिसणे अशा पद्धतीच्या त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यातून यातील काही प्रमाणपत्रे बनावट असण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तविली. मात्र, याबाबत विद्यार्थ्यांनी बाजू मांडल्यानंतरच अधिक स्पष्टता येईल, असे अधिका-यांनी सांगितले. नॅशनल मेडिकल कमिशनच्या प्रवेशाचे कार्य पाहणा-या मेडिकल कॉन्सिलिंग समितीकडे (एमएमसी) सीईटी सेलने ईमेल पाठवून या सर्व १५२ विद्यार्थ्यांचा सर्व तपशील मागविला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR