40.6 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का

लक्षद्वीपमध्ये घड्याळ चिन्हावर प्रतिबंध
मुंबई : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला असून, त्यानुसार अजित पवारांच्या पक्षाला लक्षद्वीपमध्ये घड्याळ चिन्ह मिळणार नाही. अजित पवार गटाने उशिरा अर्ज सादर केल्याने पहिल्या टप्प्यात घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले. लक्षद्वीपमध्ये पाहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे या जागेसाठी अजित पवारांना घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही.

महाराष्ट्र आणि नागालँडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला घड्याळ चिन्ह आहे. त्यामुळे तिथल्या निवडणुकीत घड्याळ अजित पवार यांना मिळणार आहे. तसेच २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांत अजित पवार यांच्या प्रत्येक उमेदवाराला घड्याळावर लढता यावे, यासाठी त्यांनी अर्ज केला होता. चिन्ह आदेश परिच्छेद १० नुसार निवडणुकांची अधिसूचना निघाल्यानंतर जास्तीत जास्त तिस-या दिवशी कॉमन चिन्हाचा अर्ज ग्रा धरला जातो. अजित पवार गटाने २४ मार्च रोजी अर्ज केला आणि पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना २० मार्च रोजी निघाली. एक दिवस उशीर झाल्याने आता पहिल्या टप्प्यात अजित पवारांना घड्याळ मिळणार नाही. लक्षद्वीप पहिल्या टप्प्यात निवडणुका होत असल्याने तिथे घड्याळ चिन्ह मिळणार नाही.

२०२३ मध्ये पडली फूट
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै २०२३ मध्ये फूट पडली. त्यानंतर निवडणूक आयोगाने बहुमताच्या जोरावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला घड्याळ हे चिन्ह दिले. तर शरद पवार यांच्या गटाला तुतारी हे चिन्ह मिळाले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता अजित पवारांना निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR