34.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रछ. संभाजीनगर मतदार संघात ४४ उमेदवार मैदानात

छ. संभाजीनगर मतदार संघात ४४ उमेदवार मैदानात

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी ५१ उमेदवारांनी ७८ अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी अर्ज छाननीअंती सात उमेदवारांचे अर्ज बाद झाले, अशी माहिती निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

निवडणूक आयोग आणि लोकप्रतिनिधी कायद्यानुसार ३६ मुद्द्यांनुसार अर्जांची छाननी करण्यात आली. सात उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने ४४ उमेदवार ंिरगणात आहेत. ज्यांनी सूचकांची संख्या दिलेली नव्हती, त्यांचे अर्ज बाद झाले. उमेदवार अपक्षकिंवा नोंदणीकृत पक्ष असेल, तर त्यांना १० सूचक लागतात. काही उमेदवारांनी कमी सूचक संख्या दिली होती. काही उमेदवारांनी सूचकांची नावे दिली, परंतु ते मतदारसंघातील नव्हते. तरीही सर्वांसमक्ष उमेदवारांना सूचकांबाबत संधी दिली होती. परंतु त्यांना दुरुस्ती करता आली नाही, असेही स्वामी यांनी सांगितले.

चार प्रादेशिक आणि बसपा या एकाच राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराचा समावेश आहे. तर ३९ अपक्ष उमेदवार आहेत. २९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून, त्यानंतर अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होईल. उमेदवारांची संख्या पाहता तीन ईव्हीएम प्रत्येक मतदान केंद्रावर लागल्यास प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR