32.8 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रजयंत पाटलांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार

जयंत पाटलांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार

सातारा : माढा लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहित पाटील यांच्यासाठी शरद पवारांनी सभांचा धडाका लावला आहे. मागील दोन दिवसांपासून शरद पवार माढा मतदारसंघात सभा घेत आहेत. आज (शनिवारी) शरद पवारांची सभा सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथे झाली. या सभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.

मी मोदीसाहेबांचे आभार मानतो. त्यांनी भोपाळला एक घोषणा केली माझा सगळा पक्ष स्वच्छ झाला. भारतातील सगळ्यात स्वच्छ पक्ष कुठला असेल तर तो राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष आहे, हे मी ठामपणे सांगतो, असे जयंत पाटील म्हणाले. आमचा पक्ष फुटला. काही लोक फुटून बाजूला गेले.

त्यांनी विचारधारा बदलली. पोरं शाळेतून गेली म्हणून शाळा बंद पडत नाही. नवीन पोरं येतात. शाळा त्यांना घडवते. आमचा हेडमास्तर खमक्या आहे, असे म्हणत जयंत पाटलांनी अजित पवार गटाला टोला लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR