38.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रछत्रपती उदयनराजेंचा ‘संकल्पनामा’ जाहीर

छत्रपती उदयनराजेंचा ‘संकल्पनामा’ जाहीर

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले पायाला भिंगरी लावून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.
उदयनराजे भोसले यांचा २०१९ च्या पोटनिवडणुकीत पराभव झाला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्या समोर शरद पवार गटाचे आव्हान आहे. शशिकांत शिंदे यांच्याशी त्यांचा थेट सामना होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत यंदा निवडणूक जिंकायचीच असा चंग राजेंनी बांधला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज उदयनराजेंनी आपला संकल्पनामा जाहीर केला आहे. सातारचा जवान आमची शान तुमचे शौर्य आमचा अभिमान ! या टॅगलाईनने उदयनराजेंचा निवडणूक संकल्पनामा जाहीर करण्यात आला आहे. यावेळी उदयनराजेंनी जवानांना साद घातली आहे.

दहशतवाद्यांशी तुम्ही सातत्याने दोन हात करीत आलात आणि या संघर्षाला पूरक कायदे करून मोदी सरकारने तुमचे सामर्थ्य वाढवले. काश्मीरला विशेषाधिकार देणारे घटनेचे ३७० वे कलम रद्द करण्याबरोबरच या सरकारने घुसखोरी रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले. जवानांच्या शौर्याबद्दल, त्यागाबद्दल कृतज्ञता आहेच; पण ती कृतिशील असावी, या भावनेतून भावी लढवय्ये तयार करणा-या साता-याच्या सैनिक स्कूलच्या अद्ययावतीकरणासाठी भरघोस निधी आणण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी ठरला.

‘वन रँक वन पेन्शन’ सारख्या जवानांच्या जिव्हाळ्याचा विषय आम्ही लावून धरला, हेही तुम्ही जाणता. स्थानिक स्तरावर सैनिकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्याधुनिक ईसीएचएस पॉलिक्लिनिक उभारणीस आमचा हातभार लागला. सातारा नगरपरिषदेच्या माध्यमातून माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या जातात. त्यासाठी अर्थसंकल्पातच तरतूद करणारी सातारा ही पहिली नगरपरिषद ठरली. सैनिकांना घरपट्टीत सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णयही सातारा नगरपरिषदेनेच सर्वप्रथम घेतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR