40.6 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeराष्ट्रीयकुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा तुरुंगात मृत्यू

कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा तुरुंगात मृत्यू

गाझीपूर : वृत्तसंस्था
कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारी याला तुरुंगात हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृ्त्यू झाला. गाझीपूरचा अन्सारी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या एका प्रतिष्ठित कुटुंबात जन्मला होता. मात्र, मुख्तारने गुन्हेगारी क्षेत्र गाठले. अन्सारीवर अनेक गुन्हे नोंद होते. मुख्तार त्याची गँग तुरुंगातूनच चालवत होता. कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय असतानाही त्याच्या गुन्हेगारीने जनता त्रस्त झाली होती.

मुख्तार अन्सारीला दोन भाऊ आहेत. यातील एक भाऊ अफजल अन्सारी सध्या गाझीपूरचे खासदार आहेत. शिवाय मुख्तार अन्सारी ५ वेळेस लोकांमधून निवडून आला होता. शिवाय त्याने ३ वेळेस तुरुंगात असूनही निवडणूक जिंकली होती. मुख्तारने २०२२ ची विधानसभा निवडणूक लढली नव्हती. त्याने मोठ्या मुलास ही निवडणूक लढण्यास सांगितले. या निवडणुकीत त्याच्या मुलाने मोठा विजय मिळवला होता. दरम्यान, अब्बास अन्सारीदेखील सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. या शिवाय मुख्तारची पत्नी शाहिस्ती परवीन आणि दुसरा मुलगा उमर अन्सारी सध्या फरार आहेत. दुसरा मुलगा आणि पत्नीवर अनेक गुन्हे दाखल आहेत.

मुख्तार अन्सारीची संपत्ती किती?
मुख्तार अन्सारीच्या गँगमधील गुंडांवर आतापर्यंत १५५ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. मुख्तार अन्सारीची एकूण संपत्ती ५८६ कोटी रुपये आहे. ती जप्त करण्यात आली आहे तर २१०० पेक्षा अधिक बेकायदेशीर व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशात योगींचे सरकार आल्यापासून मुख्तारच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली. योगी सरकारकडून वारंवार त्याच्यावर कारवाया करण्यात येत होत्या. गेल्या काही वर्षांत मुख्तारची जवळपास ६०५ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR