35.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रनिवडणूक आयोगाने ‘जय भवानी’ बाबतचा फेरविचार अर्ज फेटाळला

निवडणूक आयोगाने ‘जय भवानी’ बाबतचा फेरविचार अर्ज फेटाळला

मुंबई : निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना यूबीटी ग्रुपच्या मशाल थीम साँगमधून जय भवानी शब्द काढून टाकण्यास सांगितले होते. यावरून उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती.
निवडणूक आयोगाने जी काही कारवाई करायची आहे ती घ्यावी. निवडणूक आयोगाने आधी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर कारवाई करावी, असे उद्धव म्हणाले होते.

उद्धव गटाने निवडणूक प्रचारासाठी पक्षाचे मशाल गीत (प्रचार गीत) बनवले असून त्यात ‘भवानी’ शब्दाचा उल्लेख आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने बजावलेल्या नोटीसमधील आक्षेपावर फेरविचार करावा, असा अर्ज ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आला होता. हा अर्ज राज्यातील केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, शिवसेनेने आपल्या निवडणूक चिन्ह मशालवर आधारित आपले थीम साँग लाँच केले होते. हे गाणे १७ एप्रिल २०२४ रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने २४ एप्रिल २०२३ रोजी एक सूचना जारी केली. यामध्ये विविध कारणांसाठी काही पक्षांना ३९ नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये ठाकरे गटाच्या प्रचार गितासाठी देखील नोटीस बजावण्यात आली. यातील जय भवानी शब्द वगळा असे सांगण्यात आले आहे. मात्र ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाने बजावलेल्या नोटीसमधील आक्षेपावर फेरविचार करावा, असा अर्ज दाखल करण्यात आला यावर आज राज्यातील केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR