Homeअंतरराष्ट्रीयइराणचे परराष्ट्र मंत्री पाक, रशिया दौ-यावर

इराणचे परराष्ट्र मंत्री पाक, रशिया दौ-यावर

युद्धावर तोडगा निघणार?
तेहरान : वृत्तसंस्था
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी शुक्रवारी आपण पाकिस्तान दौ-यावर जाणार असल्याचे स्पष्ट केले. अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा रखडलेली असतानाच अराघची हे पाकिस्तानबरोबरच ओमान आणि रशिया या देशांचादेखील दौरा करणार आहेत.

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाटाघाटी ठप्प झआलेल्या असताना अराघची यांचा हा दौरा होत असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम आहे. यादरम्यान इराण अमेरिकेबरोबरच्या शांतता चर्चेच्या दुस-या फेरीत सहभागी होणार की नाही, याबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. पाकिस्तानकडून अमेरिका-इराण यांच्यातील संभाव्य चर्चेच्या दुस-या फेरीसाठी तयारी केली जात आहे. मात्र, अद्यापही मध्य पूर्वेतील युद्धावर चर्चा करण्यासाठी अराघची किंवा त्यांचे शिष्टमंडळ अमेरिकन अधिका-यांना भेटणार की नाही, याबद्दल स्पष्टता मिळालेली नाही. माझ्या या भेटींचा उद्देश द्विपक्षीय मुद्यावर आमच्या भागीदारांशी जवळून समन्वय साधणे आणि प्रादेशिक घडामोडींवर चर्चा करणे हा आहे. आमच्या शेजारी देशांना आम्ही प्राधान्य देतो, असे अराघची म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR