39.6 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeराष्ट्रीयइस्रोने सुरू केली आता चांद्रयान-४ ची तयारी

इस्रोने सुरू केली आता चांद्रयान-४ ची तयारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
चांद्रयान-३ मोहिमेच्या यशानंतर आता संपूर्ण जगाचे लक्ष चांद्रयान-४ मोहिमेकडे लागले आहे. भारताने चांद्रयान-३ मोहिमेद्वारे इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला. यामुळे भारताच्या अंतराळ मोहिमांचे महत्त्व वाढले आहे. चांद्रयान-३ च्या यशानंतर इस्रोच्या कार्याचे जगभरात कौतुक होत आहे. आता भारतीय अंतराळ संस्था चांद्रयान-४ मोहिमेच्या तयारीत आहे. चांद्रयान-४ मोहीम ही भारत आणि जपानची संयुक्त अंतराळ मोहीम असणार आहे.
चांद्रयान-४ ही भारताची महत्त्वाकांक्षी चंद्र मोहीम आहे. या मोहिमेमध्ये चंद्राचे नमुने पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. चांद्रयान-४ मोहीम भारत आणि जपानचे संयुक्त मिशन असणार आहे. इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी या दोन्ही संस्था मिळून या मोहिमेची तयारी करत आहेत

चांद्रयान-४ ही मोहीम चांद्रयान-३ मोहिमेचा पुढील टप्पा असणार आहे. या मोहिमेकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत. चांद्रयान-३ च्या यशामुळे या मोहिमेकडूनही अनेक अपेक्षा आहेत. ही चंद्र मोहीम भारत आणि जपान यांच्यातील संयुक्त अंतराळ मोहीम असून चांद्रयान-४ मोहिमेचे नाव लुपेक्स मोहीम असे ठेवण्यात आले आहे. ही मोहीम चांद्रयान-४ या नावानेही ओळखली जाईल. चांद्रयान-३ ने पाठवलेल्या माहितीच्या आधारे चांद्रयान-४ मोहिमेद्वारे चंद्रावरील पाण्याचे साठे शोधणार आहे. त्याशिवाय चंद्रावरील नमुने गोळा करून पृथ्वीवर आणण्याचाही प्रयत्न असेल.

चांद्रयान-२ मध्ये इस्रोला अपयश मिळाले होते. चांद्रयान-२ मधील लँडर विक्रमशी संपर्क तुटल्यानंतर संपर्क तुटण्याची कारणे काय आहेत, हे शोधण्यासाठी इस्रोने एक योजना तयार केली होती. चंद्र मोहिमेत कोणत्या उणिवा होत्या आणि कुठे अधिक काम करण्याची गरज आहे, याबाबत अभ्यास करण्यात आला. काळजीपूर्वक मूल्यांकन केल्यानंतर लँडिंग मॉड्यूल पुन्हा डिझाइन करण्यात आले. यानंतर इस्रोने चांद्रयान-२ च्या अपयशाचे रूपांतर चांद्रयान-३ च्या यशात केले. चांद्रयान-३ च्या यशानंतर आता आंतरराष्ट्रीय स्पेस एजन्सींनीही इस्रोमध्ये रस दाखवायला सुरुवात केली आहे.

इस्रोची महत्त्वाकांक्षी मोहीम
चांद्रयान-४ ही मोहीम चांद्रयान-३ मोहिमेचा पुढील टप्पा असणार आहे. या मोहिमेकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत. चांद्रयान ३ च्या यशामुळे या मोहिमेकडूनही अनेक अपेक्षा आहेत. ही चंद्र मोहीम भारत आणि जपान यांच्यातील संयुक्त अंतराळ मोहीम असून चांद्रयान-४ मोहिमेचे नाव लुपेक्स मोहीम असे ठेवण्यात आले आहे. ही मोहीम चांद्रयान-४ या नावानेही ओळखली जाईल. चांद्रयान-३ ने पाठवलेल्या माहितीच्या आधारे चांद्रयान-४ मोहिमेद्वारे चंद्रावरील पाण्याचे साठे शोधण्यात येणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR