40.6 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रएल अ‍ॅण्ड टी लॉजिस्टीक पार्कला भीषण आग

एल अ‍ॅण्ड टी लॉजिस्टीक पार्कला भीषण आग

नागपूर : प्रतिनिधी
अमरावती रोडवरील एल अ‍ॅण्ड टी लॉजिस्टीक पार्कला दुपारी बाराच्या सुमारास भीषण आग लागली आहे. घटनेचा कॉल अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर लगेच सिव्हिल लाईन अग्निशमन केंद्रातून ३, कळमेश्वर, वाडी व मिहान येथून प्रत्येकी एक अग्निशमनचे फायर टेंडर घटनास्थळाकडे रवाना झाले.

घटनास्थळी पोहोचताच लॉजिस्टीक पार्कमधून आगीचे प्रचंड लोट वाहत होते. आतमध्ये ऑईलचे टँकर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आग चांगलीच धुमसत आहे. अग्निशमन पथकाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

आगीमुळे लॉजिस्टीक पार्कचे टीनचे संपूर्ण शेड खाली बसल्याने अग्निशमनच्या पथकाला अडचण येत आहे. उन्हाळा सुरू झाला की शहरात आग लागण्याच्या घटना वाढतात. दोन दिवसांपूर्वी खडगाव रोडवरील आंचल प्लास्टिक कंपनीला आग लागली होती. त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR