34.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeसोलापूरनिकाल वेळेत लावण्याचे विद्यापीठाचे नियोजन

निकाल वेळेत लावण्याचे विद्यापीठाचे नियोजन

सोलापूर : मार्चअखेर सुरू होणारी विद्यापीठाची परीक्षा एप्रिलमध्ये सुरू झाली, १० मेपूर्वी संपणारी परीक्षा आता ३१ मेपर्यंत संपणार आहे. त्यानंतर १३ जूनपासून विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष सुरु होणार असल्याने उत्तरपत्रिका तातडीने तपासून निकाल वेळेत लावण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने नियोजन केले आहे. पेपर झाल्यानंतर पाच दिवसांत उत्तरपत्रिका तपासाव्यात, असे निर्देश विद्यापीठाने प्राध्यापकांना दिले आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षासध्या नेमक्या निवडणूक काळात सुरु आहेत. कर्मचारी प्रशिक्षणामुळे प्रथम वर्षाच्या उत्तरपत्रिकांची तपासणी प्रत्येक महाविद्यालय स्तरावरच होईल.द्वितीय व तृतीय वर्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी बार्शी, पंढरपूर, सोलापूर वेथील कॅप सेंटरवर सुरू आहे. इंजिनिअरिंग, फार्मसी, लॉ, शिक्षणशास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी ऑन स्क्रीन होणार आहे.

६,७ व ८ एप्रिलला होणारे पेपर पुढे ढकलण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली. आता एप्रिलअखेर आणखी एकदा कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणार असून त्यावेळी विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने पेपर घेतले जाणार आहेत. तरोपण, आगामी शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून सुरु करण्यात येणार असल्याने उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेत पूर्ण करून निकाल जाहीर करण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. विद्यापीठातील कॅम्पस व संलग्नित १०८ महाविद्यालयांमधील ६५ हजार विद्यार्थ्यांच्या जवळपास तीन लाख उत्तरपत्रिका अवघ्या काही दिवसांत प्राध्यापकांना तपासून पूर्ण कराव्या लागणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाचे अधिकारी पेपर झाल्यानंतर सातत्याने उत्तरपत्रिकांची तपासणांचा आढावा घेत आहेत.

पेपर झाल्यापासून पाच दीवसात तपासणे अपेक्षित आहे सर्वांनी वेळेत पेपर तपासून पूर्ण केल्याशिवाय निकाल वेळेत लावता येणार असून त्यादृष्टीने सर्वांना सूचना केल्या आहेत. कुलगुरू, प्र-कुलगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम वर्ष व अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाचा निकाल पहिल्यांदा लावण्याचे नियोजन आहे.असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी सांगीतले.

राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानाअंतर्गत (पोएम-उथा) श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, पुष्पश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद या चार विद्यापीठांना प्रत्येकी १०० कोटी रुपये मिळणार आहेत. या निधीमुळे योजनेअंतर्गत विद्यापीठांना विद्याथ्यांच्या भल्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणे तयार करणे, विद्यापीठांच्या भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांवर अधिक दृढपणे काम करणे, विविध प्रकल्पांना निधी मिळणार आहे. त्याउनुषंगाने काही दिवसात ‘पीएम-उषा’चे अधिकारी सोलापूर विद्यापीठाला भेट देणार आहेत. सध्या विद्यापीठात त्याची लगबग देखील सुरु आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR