32.8 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeसोलापूर'रोहयो' वरील मजुरांमध्ये घट

‘रोहयो’ वरील मजुरांमध्ये घट

दिवसाला २९७ रुपयांचीच मजुरी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांसह राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असून १९८ तालुक्यांमधील एक हजारांहून अधिक महसूल मंडळांमध्येही विदारक एक स्थिती आहे. दिवसेंदिवस दुष्काळाची तीव्रता वाढत असतानाही ‘रोहयो ‘च्या कामांवरील मजूर कमी होत आहेत. एका महिन्यात नुसत्या सोलापूर जिल्ह्यातच दोन हजार मजूर कमी झाल्याचे समोर आले आहे. सध्या लोकसभा निवडणूक सुरू असल्याने मजूर कमी झाले असावेत, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीत दररोज सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या गावोगावी सभा होत आहेत. अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने आता खऱ्या अथनि प्रचाराला सुरवात झाली आहे. त्यावेळी मोठमोठ्या नेत्यांच्या सभा देखील नियोजित आहेत. त्या सभांना गर्दी जमविण्याचे नियोजन सुरू आहे. दुसरीकडे आपल्या पक्षाचा जाहीरनामा घरोघरी पोच करणे, केलेली कामे प्रत्येकाला सांगणे, गावागावात पोस्टर चिकटवणे अशी कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यामुळे प्रत्येक गावातील अनेक तरुणांना, बेरोजगारांच्या हाताला काम मिळू लागले आहे.

तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी उमेदवारांची सभा असेल तेव्हा त्याठिकाणी गदीं दिसावी म्हणून आवर्जून उपस्थित राहणे, वरिष्ठ नेत्यांच्या सभांना भर उन्हात हजर राहणे, यासाठी
दिवसाला अंदाजे ५००रुपये मिळतात अशी चर्चा आहे. दुसरीकडे ‘रोहयो’च्या कामांवरील मजुरांना काम करूनही दिवसाकाठी अवघी २९७ रुपयांची मजुरी मिळते. या पार्श्वभूमीवर ‘रोहयो’च्या कामांवरील मजूर कमी झाले असावेत, असा अंदाज वर्तविला जात आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढा, बार्शी, करमाळा, माळशिरस व सांगोला या पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशी स्थिती संपूर्ण जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. उजनी सध्या उणे ४१ टक्के असून शेतीसाठी धरणातून पाणी सोडता येत नाही, अशी सद्यःस्थिती आहे. जमिनीची पाणीपातळी खालावल्याने विहिरीचे पाणी खोलवर गेले असून काही विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. शेतकऱ्यांवर मजुरीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर एका महिन्यात माढा तालुक्यांमध्ये रोहयो’च्या कामांवरील मजूर कमी झाले तालुक्यातील ‘रोहयो ‘च्या कामांवर दोन हजार ५८ तर दक्षिण सोलापूर तालुक्यात लुक्यात ९३ मजूर वाढले आहेत. बाकीच्या सर्वच ठिकाणी रोहयोच्या कामावरील मजूर कमी झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR