36 C
Latur
Wednesday, May 22, 2024
Homeमहाराष्ट्रएसटी-खासगी बसचा भीषण अपघात; महिला ठार

एसटी-खासगी बसचा भीषण अपघात; महिला ठार

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-मेहकर मार्गावर एसटी बस आणि एका खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये एकूण ४४ प्रवासी होते. तर त्यातील २५ प्रवासी या अपघातात जखमी झाले असून एका महिलेचा यात जागीच मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच यात सहा प्रवाशांची प्रकृती गंभीर असून सध्या जखमींना मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरील वाहनाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असून खाजगी बसने एसटी बसला मागून धडक दिली. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सध्या पोलिस करत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, बुलडाण्याच्या अहमदपूर येथून ही बस ४४ प्रवासी घेऊन निघाली होती. दरम्यान, बस चिखली ते मेहकर रोडवरील नांद्री फाट्यानजीक अली असता मागून येणा-या शिरोही ट्रॅव्हल्स या भरधाव खाजगी बसने अचानक एसटी बसला धडक दिली. या ट्रॅव्हल्सचा वेग अधिक असल्याने या अपघातात एसटी बसचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर ही खाजगी बस सुरतवरून मेहकरला जात होती. या बसमध्ये स्लीपर कोच असल्याने त्यातील झोपलेले आठ प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत.

तर एसटीमध्ये बसलेल्या एका महिला प्रवाशाचा यात जागीच मृत्यू झाला असून बसमधील इतर २५ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे. मात्र, यात सहा प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचेही बोलले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR