औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप

मुंबई : प्रतिनिधी
ऑनलाईन औषध विक्रीचे वाढते जाळे, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून ग्राहकांना दिल्या जाणा-या अव्यावसायिक सवलती आणि बनावट औषध विक्रीमुळे धोक्यात आलेला किरकोळ औषध व्यवसाय वाचवण्यासाठी आज, २० मे रोजी देशभरातील औषध विक्रेत्यांनी एकदिवसीय बंद पुकारला आहे. ‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट’ आणि ‘महाराष्ट्र स्टेट केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशन’ने या संपाची हाक दिली आहे. या हाकेला प्रतिसाद देत राज्यातील लाखो मेडिकल दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, आणि नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये या संपाला १०० टक्के प्रतिसाद मिळत आहे. यामुळे किरकोळ औषध बाजारपेठा पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत.

सकाळपासूनच राज्यातील बहुतांश बाजारपेठांमधील औषधांची दुकाने बंद आहेत. नेहमी रुग्णांच्या नातेवाईकांनी गजबजलेली मेडिकल स्टोअर्स आज बंद असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वच मेडिकल दुकानांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अनेक शहरांमध्ये औषध पुरवठा साखळीवर याचा थेट परिणाम झाला आहे. किरकोळ व्यापा-यांनी एकत्र येत विविध शांततापूर्ण मार्गाने निदर्शने देखील केली आहेत. मात्र, सुजाण नागरिकांनी आणि नियमित औषध घेणा-या रुग्णांनी खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक औषधांचा साठा एक दिवस आधीच केला आहे. त्यामुळे अद्याप कोणतीही मोठी धावपळ उडालेली नाही.

देशातील औषध व्यवसायाची वार्षिक उलाढाल अब्जावधी रुपयांची असून त्यावर लाखो कुटुंबांचा रोजगार आणि उदरनिर्वाह अवलंबून आहे. परंतु, गेल्या काही वर्षांत या क्षेत्राला भांडवलशाही आणि ऑनलाईन कंपन्यांचे ग्रहण लागल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.

व्यापा-यांच्या प्रमुख मागण्या
ई-फार्मसीवर पूर्ण बंदी किंवा कठोर नियंत्रण : डॉक्टरांच्या वैध चिठ्ठीशिवाय ऑनलाईन औषधे घरपोच दिली जात असल्यामुळे अमली पदार्थांचा आणि गर्भपाताच्या गोळ्यांचा गैरवापर वाढला आहे. यावर सरकारने त्वरित बंदी घालावी.

कॉर्पोरेट सवलतींना चाप लावणे
मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या अवाजवी सवलती देऊन किरकोळ बाजारातील स्पर्धा मोडीत काढत आहेत. यामुळे सामान्य दुकानदार आर्थिक संकटात सापडला आहे.
पारदर्शक कायद्याची गरज : फार्मासिस्ट नसताना औषध विक्री करणे सार्वजनिक आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने औषध विक्रीबाबत अत्यंत कठोर नियमावली आणि पारदर्शक कायदा करावा.

परवाना प्रक्रियेत सुलभता
अन्न व औषध प्रशासनाकडून औषध परवान्यांशी संबंधित नियमांचे सुलभीकरण व्हावे आणि किरकोळ व्यापा-यांवर होणारी जाचक कायदेशीर कारवाई थांबवण्यात यावी.

रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी चोख व्यवस्था
या देशव्यापी बंदमुळे रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून राज्य शासनाचे अन्न व औषध प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. एफडीए प्रशासनाने सर्व जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू केले असून विभागनिहाय विशेष अधिका-यांची नियुक्ती केली आहे. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी शासकीय व खाजगी रुग्णालयांच्या आवारातील मेडिकल दुकाने तसेच २४ तास सुरू राहणारी आपत्कालीन औषध दुकाने या बंदमधून वगळण्यात आली आहेत. गंभीर आणि आपत्कालीन रुग्णांना औषधांचा तुटवडा भासू नये, याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.
दरम्यान, शासनाने केवळ कारवाईची भूमिका न घेता औषध विक्रेते संघटनांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलवावे. या समस्येवर कायमस्वरूपी व कायदेशीर तोडगा काढावा, अशी मागणी व्यापारी संघटनांच्या नेत्यांनी केली आहे.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
धर्माबाद तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
01:59
Video thumbnail
धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये क्रिकेटचा महाकुंभ; विलासराव देशमुख चॅम्पियनशिप २०२६..
02:56
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉक्टरांच्या मुलांसह मोटेगावकरांच्या मुलांसाठी खास क्लास ?CBI च्या चौकशीत उघड
01:49
Video thumbnail
BIG BREAKING : लातूरच्या नारायण नगर परिसरात CBI ची धडक;विद्यार्थ्याने नीट पेपर विकत घेतल्याचा संशय
01:48
Video thumbnail
टेंभुर्णीत भीषण आग! फर्निचर, हार्डवेअरसह इलेक्ट्रॉनिक्सची ३ दुकाने खाक; कोट्यवधींचे नुकसान
01:46
Video thumbnail
हिमायतनगर तालुक्यात पेट्रोल-डिझेलचा प्रचंड तुटवडा; शेतीची कामे रखडल्याने शेतकरी आक्रमक
03:18
Video thumbnail
ऑनलाईन औषध विक्रीविरोधात जळकोट तालुक्यात 'केमिस्ट'चा कडकडीत बंद; तहसीलदारांना निवेदन!
02:05
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|ED च्या रडारावर प्रा. शिवराज मोटेगावकरांची बेहिशोबी संपत्ती?
05:06
Video thumbnail
ब्रेकिंग : मोटेगावकरांच्या पत्नीला देखील CBI ची नोटीस
02:09
Video thumbnail
'लातूर पॅटर्न' : एका शैक्षणिक क्रांतीचा उगम, सुवर्णकाळ आणि बदलत्या प्रवासाचा अंतर्वेध
06:11
Video thumbnail
नांदेडमध्ये डिझेलचा तुटवडा; वाहनधारकांची परवड, तर जिल्हाधिकाऱ्यांचा 'पायी चालण्याचा' अजब सल्ला!
03:03
Video thumbnail
लातूर पॅटर्नवर पेपर फुटीचे सावट? ट्युशन एरियातून ग्राउंड रिपोर्ट!
08:41
Video thumbnail
BIG BREAKING : नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर, औसा रोड परिसरातील हॉस्पिटलमध्ये चौकशी सुरू!
02:38
Video thumbnail
NEET पेपरफुटीविरोधात माढ्यात युवक काँग्रेस आक्रमक; शाहूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन
01:16
Video thumbnail
Latur|नीट पेपर फुटी प्रकरणातील इनसाईड स्टोरी A to Z
09:46

Latest news