38.3 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeनांदेडखा. चव्हाण यांचे नांदेड शहरात जल्लोषात स्वागत

खा. चव्हाण यांचे नांदेड शहरात जल्लोषात स्वागत

नांदेड प्रतिनिधी
राज्यसभेवर अशोकराव चव्हाण यांची निवड झाल्यानंतर ते आज पहिल्यांदाच नांदेड शहरात दाखल झाले. खा. चव्हाणांचे नांदेडात आगमन झाल्यानंतर हजारोंचा जनसमुदाय त्यांच्या स्वागतासाठी जमला होता. यानिमित्ताने शहरात ठीकठिकाणी ढोलताशाच्या गजरात व फटाक्याच्या आतशबाजीत त्यांचे अभुतपुर्व स्वागत करण्यात आले. खा.चव्हाण यांच्या स्वागतासाठी विमातळापासून ते शिवाजीनगर पर्यत कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

विमानतळावर आगमन झाल्यानंतर जिल्ह्यातून आलेल्या हजारो कार्यकते खा. चव्हाण यांच्या जल्लोषात स्वागतासाठी जमले. विमानतळापासून उघड्या जीपमधून खा. चव्हाण यांची मिरवणूक काढण्यात आली. विमानतळ, राज कॉर्नर, वर्कशॉप, श्रीनगर, आटीआय महात्मा फुले पुतळा येथून शिवाजीनगर त्यांच्या निवासस्थानापर्यंत कार्यकर्त्यांनी दोन्ही बाजूने गर्दी करून खा. चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या व स्वागत केले. राज कॉर्नर चौकामध्ये स्वागत झाल्यानंतर श्रीनगर भागातही ढोल ताशाच्या गजरात फटाक्याची आतिषबाजी केली. कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केले.

त्यानंतर आयटीआय चौकात महात्मा फुले पुतळ्यासमोर चौरस्त्यावर हजारोचा जनसमुदाय खा. चव्हाणाची वाट पाहत जवळपास तीन तास थांबले होते. अखेर ४.४५ वाजता आगमन झाले. यावेळी दोन क्विंटलचा पुष्पहार क्रेनद्वारे त्यांना घालण्यात आला. स्वागतासाठी माजी सभापती किशोर स्वामी यांच्या पुढाकारातून कार्यकर्त्यांनी भव्य स्वागताचे आयोजन केले होते. दोन्ही बाजूंनी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ढोलताशाच्या गजरात फुलांची उधळण करून स्वागत केले. आयटीआय चौरस्त्यावर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. वाहतूक मिरवणूक मार्गावरून पूर्णत: बंद करण्यात आली होती. कलामंदिरपासून राज कॉर्नर पर्यंत दोन्ही बाजूने वाहतूक बंद करून मिरवणुकीतून येणा-्या वाहनांना अडथळा होणार नाही याची खबरदारी पोलिसांनी घेतली.

खा. चव्हाण यांचे आगमन विमानतळावर झाल्यानंतर मिरवणूकीचा मार्ग बंद केला व अन्य मार्गाने वाहतूक वळविण्यात आली. मिरवणुकीत माजी आ. अमरनाथ राजूरकर भाजपा महानगराअध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, संतुकराव हंबर्डे, माजी सभापती किशोर स्वामी, विजय येवनकर यांच्यासह खा.चव्हाण यांचे निष्ठावंत कार्यकर्ते व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. हजारोचा नागरिकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूने थाबुन जयघोषात ढोल ताशाच्या गजराने स्वागत केले फटाक्याच्या आतिषबाजिने शहर दुमदुमले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR