31.7 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeनांदेडसंविधान बदलता येणार नाही : खा. चव्हाण

संविधान बदलता येणार नाही : खा. चव्हाण

नांदेड : प्रतिनिधी
देशाच्या संविधानाचा मुळ गाभा कोणालाही बदलता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. परंतू पराभवाच्या भितीने विरोधक भाजपाकडून देशाचे संविधान बदण्याचा डाव रचण्यात येत आहे, असा अपप्रचार करीत आहेत. परंतू लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. यामुळे नांदेडातून प्रताप पाटील चिखलीकर तर विजयी होतील, सोबतच देशात भाजप महायुतीची सत्ता येईल असा विश्वास माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला. तर नांदेडमधील विरोधकांकडे विकासाचे कोणतेही मुद्दे नसल्याने नकारात्मक मुद्दयावर बोलत आहेत. यातून त्यांची वैचारिक पातळी घसरल्याचे दिसून येत आहे, अशी टिका केली.

खा.चव्हाण पुढे म्हणाले की, देशासह नांदेडच्या विकासाचे भाजपकडे व्हीजन आहे. पंतप्रधान नरें मोदी यांच्यावर विश्वास असल्याने अनुकूल वातावरण आहे. यामुळे नांदेडातून खा.प्रताप पाटील चिखलीकर हे निश्चित विजयी होती. तर दुसरीकडे विरोधकांकडे विकासाचे मुद्दे, रोडमॅप नाही. यामुळे केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी अपप्रचार केला जात आहे. यात वैयक्तिक पातळीवर आरोप केले जात आहेत. यात अशोक चव्हाण केंद्रीय यंत्रणांना घाबरून भाजपात गेले, आदर्श घोटाळ्यातही दोषी आहेत असा अपप्रचार करण्यात येत आहे.

परंतु माझ्यामागे कोणतीही तपास यंत्रणा नाही. तर आदर्श प्रकरणात माझ्या बाजूने हायकोर्टाने निकाल दिला आहे. तर ज्या काँग्रेसच्या उमेदवारास सहकारातील काही कळत नाही, नायगावात ज्यांना पिठाची गिरणी सुरू करता आली नाही ते साखर कारखान्यावर बोलत आहेत. कारखाना कोणाच्या बापाचा नाही, असे बोलून खालच्या पातळीवर बोलत आहेत, हे खेदजनक आहे. विरोधक पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याही भाषणाची तोडफोड करून क्लिप फिरवत आहेत. हे सर्व राजकीय स्वार्थासाठी केले जात आहे, अशी टीका केली. तर मराठा समाजास १० टक्के आरक्षण लागू केले आहे. याबाबतचा कायदाही पारित झाला आहे. आंदोलकांवरील किरकोळ गुन्हे मागे घेण्यात येत आहेत. हे सर्व सकारात्मक सुरू असताना काही मंडळी स्वार्थासाठी आरक्षणाचा वापर करीत आहेत. यावेळी खा.अजित गोपछडे, दिलीप कंदकुर्ते, अ‍ॅड.चैतन्य बापू देशमुख, प्रविण साले, बाळू खोमणे उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR