गर्भधारणेच्या जनुकीय ‘स्विच’चे रहस्य उलगडले!

नवी दिल्ली : प्रतिनिधी
भारतीय शास्त्रज्ञांनी गर्भधारणेच्या प्रक्रियेत क्रांतिकारी शोध लावला आहे. गर्भाशयाच्या भिंतीत असणारा एक जनुकीय ‘स्विच’ (बटण) गर्भधारणेची सुरुवात कशी होते हे ठरवतो, असे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. या शोधामुळे वंध्यत्व, पुन:पुन्हा होणारे गर्भपात आणि ‘आयव्हीएफ’ उपचारांतील यशाचा दर वाढवण्यासाठी नवे मार्ग खुले होतील, असा विश्वास डॉ. गीता सचदेव यांनी व्यक्त केला आहे. भारतीय विज्ञान क्षेत्रासाठी ही एक ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह अँड चाईल्ड हेल्थ, बनारस हिंदू विद्यापीठ आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर यांच्या संयुक्त संशोधनातून हा शोध लागला आहे. या अभ्यासात दोन प्रमुख गुणसूत्रे गर्भाशयाच्या भिंतीवर पोहोचताच (एक लहान द्वार) भित्तिका योग्यवेळी उघडते किंवा बंद होते, हे स्पष्ट झाले आहे.
गर्भधारणा होण्यासाठी शुक्राणू आईच्या गर्भाशयाच्या भिंतीवर चिकटून बसणे आवश्यक असते. गर्भाशयाची आतील भित्तिका सामान्यत: मजबूत आणि बंद असते, जणू किल्ल्याची भिंत. मात्र, शुक्राणू येताच गर्भाशयातील पेशी मऊ आणि लवचिक होतात, त्यामुळे त्या थोड्या हलतात आणि त्याला आत प्रवेश मिळतो.
या प्रक्रियेत संतुलन अत्यंत महत्त्वाचे आहे. जर गर्भाशयाची भिंत पुरेशी उघडली नाही, तर गर्भ चिकटू शकत नाही आणि भिंत खूपच उघडली, तर गर्भधारणा टिकू शकत नाही. या जनुकांच्या संतुलनावर गर्भधारणा यशस्वी होणे अवलंबून असते. या शोधामुळे ‘आयव्हीएफ’ उपचारांतील यशाचा दर वाढवण्यासाठी आणि पुन:पुन्हा होणा-या गर्भधारणेच्या अपयशाचे कारण शोधण्यासाठी नवे मार्ग उपलब्ध होतील, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
या शोधामुळे गर्भधारणेच्या सुरुवातीला येणारे अपयश, पुन:पुन्हा होणारे गर्भपात आणि वंध्यत्व यासारख्या समस्यांवर नवे उपाय शोधता येतील. तसेच, भविष्यात गर्भधारणा अधिक यशस्वी होण्यासाठी आणि ‘आयव्हीएफ’ उपचार सुधारण्यासाठी या जनुकीय ‘स्विच’चा वापर करता येईल, असे डॉ. गीता सचदेव यांनी सांगितले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
02:39:31
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news