30.7 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeलातूरटवेन्टिवन अ‍ॅग्रीच्या संचालिका अदिती देशमुख यांनी महिलांशी साधला सुसंवाद

टवेन्टिवन अ‍ॅग्रीच्या संचालिका अदिती देशमुख यांनी महिलांशी साधला सुसंवाद

लातूर : प्रतिनिधी
लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. काळगे शिवाजी बंडाप्पा यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन टवेन्टिवन शुगर्सच्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख यांनी प्रभाग २ मधील महीलांशी आयोजीत सुसंवाद बैठकीत केले.
लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. काळगे शिवाजी बंडाप्पा यांच्या प्रचारार्थ प्रभाग २ मधील महीलांची बैठक लिज्जत पापडच्या संचालीका शिला वाघमारे यांच्या निवासस्थानी आयोजित केली होती,  या प्रसंगी त्या बोलत होत्या. या बैठकीस माजी महापौर प्रा. डॉ. स्मिता खानापुरे, संगीता मोळवणे, सपना किसवे आदी उपस्थित होते. बैठकीस प्रभाग २ मधील महीला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR