39.2 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeनांदेडटाकळी नेर पडसा नदीपात्रात वाळू तस्करीचा मेळा

टाकळी नेर पडसा नदीपात्रात वाळू तस्करीचा मेळा

श्रीक्षेत्र माहूर : प्रतिनिधी
माहूर तालुक्यातील नदीपात्राला लागून असलेल्या सर्वच गावातून गेलेल्या रस्त्या वरून वाळू तस्करी जोमात सुरू झाली असून आचारसंहितेच्या नावावर महसूल विभाग वाळू तस्करांशी हात मिळवणी करून मोठ्या रकमा घेत या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असून नव्याने रुजू झालेल्या सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली आणि माहूरचे सपोनी शिवप्रकाश मुळे यांच्या नावाचा दरारा कमी झाल्याने नदीपात्रातून लाखोंची वाळू चोरी खुलेआम सुरू आहे.

माहूर तालुक्याला लागून असलेले मोहपूर कुपटी हिंगणी दिगडी कुत्तेमार लांजी नेर टाकळी पडसा म दनापूर सायफळ कोळी यासह या गावांमधील अंतर्गत रस्त्यातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू असून वाळू तस्करीसाठी जिल्हाभर गाजलेले टाकळी पडसा नेर कुत्तेमार दिगडी या गावात असलेल्या वाळू तस्करांनी नदीपात्रात उच्छाद मांडला असून स्थानिक पत्रकार फोटो शूटिंग काढण्यासाठी गेले असता त्यांना जिवे मारण्याचा धमक्या देण्यात येत असल्याने तहसीलदार सह पोलीस आणि पत्रकार नदीपात्रात जाण्यासाठी यापैकी कोणीही धजावत नाही.

तालुक्यातील एका मोठ्या नेत्याच्या आशीवार्दाने मौजे टाकळी येथील वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात वाळू चोरी करत असून अनेक ट्रॅक्टर टिप्पर धारकांचा हवाला घेऊन महसूल आणि पोलिसांना पोहोचवत त्यांना दिवस रात्र वाळू तस्करी करण्यासाठी मुभा मिळवून दिली असल्याची चर्चा माहूर तालुक्यात सुरू झाली असून येत्या निवडणुकीत हा जमा झालेला पैसा तो वाळू तस्कर त्यांच्या उमेदवारा साठी खर्च करणार असल्याची चचार्ही आहे त्यामुळे महसूल विभाग आणि पोलीस विभाग ही भावी खासदाराच्या कार्यकत्यार्ला वाळू तस्करी करण्याची खुलेआम सूट दिली असल्याची चर्चा असून त्यांच्या भानगडीत माहूर शहरातील घरकुलधारक आणि बांधकामासाठी वाळू पाहिजे असलेले नागरिक महागडी वाळू घेण्यासाठी मजबूर असून शासनाकडून गोरगरिबांसाठी सुरू करण्यात आलेली घरकुल योजना वाळूमुळे मोफत तितकीच महाग पडत असल्याचे दिसत असून महसूल विभागाकडून दोन ठिकाणी फक्त ७० ब्रास वाळू जप्तीच्या पावत्या देण्यात येत असल्याची चर्चा असून वाळू डेपो ही सुरू होणार असल्याची चर्चा आहे परंतु या दोन्ही ठिकाणहून घरकुलधारकांना स्वस्त वाळू मिळेल काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मौजे टाकळी सायफळ कोळी आणि नेर लांजी या ठिकाणी असलेल्या वाळू पात्रात चाळणी करण्याची गरज नसलेली बारीक वाळू प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे वाळू तस्करांनी वाळू डेपो घेणारे बाहेरचे असल्याने मोजक्या काही दिवसात वाळू डेपो सुरू होणार असल्याने या ठिकाणची वाळू पुसद दिग्रस यवतमाळ घाटंजी महागाव उमरखेड या ठिकाणच्या मोठमोठ्या डंपर द्वारे चोरी करणे सुरू केले असून येथे आठ दिवसात डेपो सुरू न झाल्यास या नदीपात्रातील वाळू घाटात वाळूच्या ठिकाणी रोडाच शिल्लक राहणार असल्याची चर्चा असून इतक्या मोठ्या प्रमाणात 200 ते 250 ट्रॅक्टर टिप्पर डंपर द्वारे वाळू उपसा सुरू असून रात्रभर ही वाळू चोरी सुरू असल्याने नागरिक आणि पत्रकार इकडे जाण्यास धजावत नसल्याचे वास्तव चित्र असून या ठिकाणी पोलीस महानिरीक्षक आणि महसूल चे आयुक्तांनीच कारवाई करावी तरच हे आटोक्यात येईल अशी चर्चा होत आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR