33.9 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रनाराज भाजप खासदारांची पत्नी मैदानात

नाराज भाजप खासदारांची पत्नी मैदानात

शिवसेना ठाकरे गटाकडून लढणार
जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवार जाहीर झाला नसल्याने भाजपला तगडे आव्हान देण्यासाठी भाजपचे नाराज असलेले विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

भाजपचे उन्मेष पाटील यांचा पत्ता कट केल्याने ते नाराज दिसत आहेत. जळगाव लोकसभेत उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी अनेकदा दिल्लीवारी केली. मात्र ही वारी त्यांना पावली नाही. शेवटी स्मिता वाघ यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे उन्मेष पाटील भाजपवर नाराज झाले. पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मी पक्षावर नाराज नसल्याचे त्यांनी जाहीर केले. पण ते प्रत्यक्षात नाराज आहेत. आठ दिवसांपूर्वीच भाजपाच्या जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक जळगाव येथे घेण्यात आली. या बैठकीतदेखील उन्मेष पाटील गैरहजर दिसून आले. याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मला बैठकीबाबत कुठलाही फोन किंवा एसएमएस आलेला नाही. त्यामुळे मी बैठकीला येऊ शकलो नाही. तिकीट डावलल्याने एकदाही उन्मेष पाटील हे जळगाव शहरात भाजपच्या कार्यकर्ता किंवा पदाधिका-यांच्या भेटीगाठी साठी आलेले नाहीत. यामुळे त्यांची नाराजी उघड दिसून आली.

ठाकरेंची गोपनीय भेट?
भाजपने उमेदवारी नाकारल्याने उन्मेष पाटील यांनी मागील आठवड्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची गोपनीय भेट घेतली असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली होती. आज मातोश्री दरबारात महाराष्ट्रातील काही उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली. यात विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांचेही नाव त्या ठिकाणी चर्चेत घेण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR