पत्नीवर गर्भधारणेस सक्ती करता येत नाही!

नवी दिल्ली : प्रतिनिधी
वैवाहिक कलह किंवा पती-पत्नीमध्ये वाद सुरू असताना पत्नीवर गर्भधारणा सुरू ठेवण्यासाठी सक्ती केली जाऊ शकत नाही. असे करणे हे केवळ तिच्या शारीरिक स्वायत्ततेचे उल्लंघन नसून तिच्या मानसिक त्रासात भर टाकणारे आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. या टिप्पणीसह न्यायालयाने पतीकडून दाखल करण्यात आलेल्या फौजदारी खटल्यातून पत्नीची निर्दोष मुक्तता केली.

न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांनी एका महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निकाल दिला. सत्र न्यायालयाने या महिलेविरुद्ध ‘गर्भपात करण्याच्या’ (आयपीसी कलम ३१२) आरोपाखाली फौजदारी प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते, जो उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. ‘प्रजननावर नियंत्रण ठेवणे ही प्रत्येक महिलेची मूलभूत गरज आणि अधिकार आहे. गर्भपातासाठी पतीची संमती घेणे कायदेशीररीत्या अनिवार्य नाही,’ असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

महिलेच्या शरीरावर तिचा स्वत:चा अधिकार आहे. जर तिला गर्भधारणा नको असेल, तर त्याविषयी जबरदस्ती करणे हे संविधानाच्या अनुच्छेद २१ (जगण्याचा अधिकार) अंतर्गत तिच्या निजतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. अनपेक्षित गर्भधारणा महिलेच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते. विशेषत: जेव्हा वैवाहिक संबंध तणावपूर्ण असतात, तेव्हा मूल वाढवण्याची जबाबदारी एकटीवर येण्याची शक्यता असल्याने तिला प्रचंड मानसिक आघात सहन करावा लागतो, असेही न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांनी स्­पष्­ट केले.

पतीने असा युक्तिवाद केला होता की, गर्भपाताच्या वेळी ते सोबत राहत होते आणि त्यांच्यात वाद नव्हते. मात्र, न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला. वैवाहिक कलह म्हणजे केवळ घटस्फोट किंवा कायदेशीर लढाई नव्हे; जर महिला मानसिक तणावात असेल आणि तिने वेगळे होण्याचे मानसिकरीत्या ठरवले असेल, तरीही तिला गर्भपाताचा अधिकार आहे, असे न्यायालयाने नमूद केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
02:39:31
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news