38.3 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeलातूरमहात्मा गांधी महाविद्यालयात अद्यावत भूकंप वेध यंत्रणेची सुविधा उपलब्ध

महात्मा गांधी महाविद्यालयात अद्यावत भूकंप वेध यंत्रणेची सुविधा उपलब्ध

अहमदपूर : प्रतिनिधी
अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयाने भूकंप वेध यंत्रणेची सुविधा उपलब्ध केली असुन भूगोल विभाग सुसज्ज करण्यात येत आहे. या भूकंप वेध शाळेमध्ये दि. २१ मार्च रोजी सकाळी ६.०८.३० वाजता ४.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद दिसून आलेली आहे. सदरील इमेज मध्ये एमएचएमडी-१,२,३ हिंगोलीतील रामेश्वर तांडा हे भूकंपाचे केंद्र भूकंप मापण यंत्रणेवर हिंगोली जिल् Þातील वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांडयाच्या उत्तर भागात भूकंपाचे केंद्र असल्याचे दिसून आले.

या भुकंपाची खोली १० किलोमीटर असल्याचे दिसत आहे. लगेचच दुसरा सौम्य धक्का पहिल्या धक्क्यानंतर अकरा मिनिटांनी म्हणजे सकाळी ०६.१९.०५ वाजता ३.६ रिश्टर स्केल चा भूकंप झाल्याची नोंद भूकंप मापण यंत्रणेवर दिसुन आली. मात्र या भूकंपाचे केंद्र तीन किलोमीटर दक्षिणेला असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या रामेश्वर तांडयाच्या दक्षिण भागात असल्याचे दिसून आले. याही भूकंपाची खोली १० किलोमीटर असल्याचे दिसत आहे. मराठवाड्यातील १९९३ च्या भूकंपानंतरचा हा सर्वात मोठा आहे. यावेळेस हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या भूकंपाचे धक्के बसल्याचे दिसून आले आहे.

सदरील भूकंप वेधशाळेतील भूकंप यंत्रणेला भेट देण्यासाठी विचार विकास मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. किशनराव बेंडकुळे, सरचिटणीस अ‍ॅड. पी. डी. कदम, उपाध्यक्ष विजयकुमार देशमुख, युवराज पाटील. सहसचिव वसंतराव फड, सुरेशराव देशमुख, कोषाध्यक्ष रामचंद्र शेळके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. शेळके, कार्यालयीन अधीक्षक एस. बी. सूर्यवंशी आणि भूगोल विभागाचे विभाग प्रमुख प्रो. डॉ. नितीन देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. या यंत्रणामुळे अहमदपूर परिसरातील लोकांना सदरील वेधशाळेचा उपयोग होणार आहे. ही वेधशाळा आणण्यासाठी महात्मा गांधी महाविद्यालयाचे भूगोल विभागाचे विभाग प्रमुख प्रो. नितीन देशमुख यांनी निकराचे प्रयत्न केल्यामुळे आणि ते भुकंपाचे अद्यावत यंत्र या महाविद्यालयात आणले असल्यामुळे डॉ. नितीन देशमुख यांचे सर्व मंडळाच्या वतीने व प्राचार्याच्या वतीने कौतुक केले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR