37.7 C
Latur
Tuesday, May 7, 2024
Homeलातूर‘दिशा’द्वारे निवडणुकीचे आदेश अभाशी मिळणार

‘दिशा’द्वारे निवडणुकीचे आदेश अभाशी मिळणार

निलंगा :  प्रतिनिधी
लातूरच्या ‘दिशा’ पॅटर्नमुळे देशात पहिल्यांदाच निवडणुकीचे आदेश अभाशी पद्धतीने मिळणार आहेत .हे दिशा नावाचे अ‍ॅप  उपविभागीय अधिकारी निलंगा तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या कल्पनेतून तहसीलदार प्रसाद कुलकर्णी व नायब तहसीलदार कुलदीप देशमुख यांच्या सहाय्याने तयार केल्यामुळे जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शरद झाडके यांचा सत्कार करून टीमचे अभिनंदन केले.
     जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यात प्रथमच लोकसभा निवडणूक २०२४ करता निवडणूक कर्तव्यावर नेमण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी म्हणजेच मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे नियुक्ती ही कोणत्या मतदारसंघात कोणत्या मतदान केंद्रावर करण्यात आली आहे त्यांचे प्रशिक्षणाचे स्थळ त्याचा दिनांक, वार तसेच त्यांच्या समवेत असलेल्या टीममधील सर्वांचे नाव व मोबाईल क्रमांक डायलरसह, क्षेत्रीय अधिका-याचे नाव, साहित्य जमा करण्याचे ठिकाण प्राप्त करण्याचे ठिकाण व मतदान केंद्रावर जावयाच्या वाहनाचा क्रमांकसह आदी माहिती दिशा या अ‍ॅपद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
यासोबत दिलेल्या युआरएल अथवा क्यूआर कोडचा वापर करून त्यांनी दिशा अ‍ॅप त्यांच्या मोबाईलवर घेतल्यास त्यांना उपरोक्त माहिती प्राप्त होणार आहे. निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीत दि २२ एप्रिलपासून सदरील अ‍ॅप निवडणूक कर्तव्यावर असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचा-यांंना उपलब्ध करून देण्यात आली आहे.  सदरील अ‍ॅप जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे निवडणूक निर्णय अधिकारी लातूर लोकसभा निवडणूक व सहा विधानसभा मतदारसंघाचे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व उपजिल्हाधिकारी नोडल अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्वांना उपलब्ध करून देण्यात येऊन त्याचे पीपीटीद्वारे माहिती दाखवण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR