34.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे लोकसभा मतदार संघात ८३ लाख ३८ हजार ७४७ मतदार

पुणे लोकसभा मतदार संघात ८३ लाख ३८ हजार ७४७ मतदार

पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील विशेषत शहरी भागातील मतदाराची टक्केवारी वाढविण्यासाठी गेल्या तीन वर्षात युवा मतदार, उद्योगांमध्ये काम करणारे मतदार, महिला मतदार यांच्यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातिल चार लोकसभा मतदार संघात ८३ लाख ३८ हजार ७४७ इतकी मतदार संख्या असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितली .

पहिल्यांदा मतदान करणा-या १८ ते १९ वयोगटातील युवा मतदारांची संख्या १ लाख १ हजार ४४४ तर २० ते २९ वयोगटातील मतदारांची संख्या १३ लाख ८० हजार ४३१ असल्याची माहिती त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात ८ हजार ३८२ मतदान केंद्रे असून १९ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. अतिसंवेदनशील मतदान केंद्र एकही नसून शॅडो भागातील ३८ मतदान केंद्रे आहेत. येथे संपर्कासाठी हॅम रेडिओसह अन्य व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मतदारसंघांसाठी मिळून १० हजार ३१ क्षेत्रीय (सेक्टर) अधिकारी तसेच ८५९ सेक्टर पोलीस अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. टपाल, ईमेल आदीद्वारे तसेच सी-व्हिजीलद्वारे आचारसंहिता मोठ्या ७८२ तक्रारी प्राप्त झाल्या असून कार्यवाही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR