36.3 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeनांदेडमाजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांकडून नांदेड शहरात स्वागत

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांकडून नांदेड शहरात स्वागत

प्रतिनिधी :
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख बुधवार दि. ३
एप्रिल रोजी दुपारी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी (काँग्रेस,
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
पक्ष) अधिकृत उमेदवार वसंतराव बळवंतराव चव्हाण पाटील यांचा उमेदवारी अर्ज
भरण्यासाठी व महारॅलीसह सभेला उपस्थित राहण्यासाठी नांदेड शहरात त्यांचे
आगमन झाले असता महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे जंगी स्वागत
करण्यात आले.

याप्रसंगी नांदेड दक्षिणचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे, नांदेड लोकसभा
मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंतराव बळवंतराव पाटीलचव्हाण, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार हनमंतराव
पाटील बेटमोगरेकर,

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्य संघटक
एकनाथ पवार, नांदेड शहर प्रमुख गौरव कोडगिरे, लोहा तालुका काँग्रेस
कमिटीचे अध्यक्ष शरद पवार, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष
डॉ.विठ्ठल पावडे, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, राजेसाहेब
सवई, मुकेश पाटील, साहेबराव काळे, गिरीधर पाटील, डाकोरे सुभाष, रायबोले
राजू, खुशालराव जाधव, कांडाळकर माधव, डोम्पले केदार आदीसह महाविकास
आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR