33.5 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeसोलापूरअवकाळीतील नुकसानग्रस्तांना लवकरच मदत

अवकाळीतील नुकसानग्रस्तांना लवकरच मदत

सोलापूर: जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे दोन व्यक्तींसह ७२ जनावरांचा मृत्यू झाला आहे.मृत व्यक्तीला प्रत्येकी चार लाखांची मदत दीली जाणार आहे. तर मृत जनावरांसाठीही नियमानुसार भरपाई दीली जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली.

एप्रील महिन्यात जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे दोन व्यक्तींचा मृत्यु झाला आहे.शासनाने नैसर्गीक आपत्तीच्या काळात निगेटिव्ह ग्रॅण्डमधून निधी वितरीत करण्यासंदर्भात आदेश दीले आहेत.त्यामुळे अवकाळी पाऊसात मृ त व्यक्ती व जनावरांसाठी नुकसानभरपाई मीळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.परंतु शेतीच्या नुकसानीचे पंचनामे अजून पूर्ण झाले नाहीत. कृषी विभागाकडील प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील अडीच हजार हेक्टरवरील पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात केळी,आंबे, द्राक्ष अशा पिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. दरम्यान, पंचनामे लवकरात लवकर पुर्णकरून अहवाल देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यावर नेमके किती नुकसान झाले आहे, त्याचा अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे.त्यानंतर शासनाकडून संबंधितांना भरपाई मिळणार आहे.

अवकाळी पावसामुळे प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील दोन हजार ५५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर दोन व्यक्तींचा आणि ७२ लहान-मोठ्या जनावरांचाही मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती व जनावरांसाठी लवकरच मदत वितरित केली जाईल. शेती नुकसानीचे पंचनामे काही दिवसांत पूर्ण होऊन त्याचा अहवाल शासनाला सादर होईल.असे निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR