39.1 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeधाराशिवयेरमाळा येथील येडेश्वरीच्या यात्रेत चोरट्यांचा सुळसुळाट

येरमाळा येथील येडेश्वरीच्या यात्रेत चोरट्यांचा सुळसुळाट

धाराशिव : प्रतिनिधी
कळंब तालुक्यातील येरमाळा येथे येडेश्वरी देवीची वार्षिक यात्रा सुरू आहे. यात्रेनिमित्त राज्य, परराज्यातून लाखो भाविक दाखल झाले होते. चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन अनेकांचे सोन्याचे दागिने, महिलांच्या गळ््यातील सोन्याचे गंधन, पैशाची पाकीटे हातोहात लंपास केली. यात्रेसाठी येरमाळा येथे आलेल्या बसमधील डिझेलची चोरी केली. या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाणे येथे दि. २५ एप्रिल रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी (जि. बीड) तालुक्यातील कन्हेरवाडी येथील सुरेश उर्फ नाना वसंतराव फड हे (वय ३७ वर्षे) हे दि. २४ रोजी येरमाळा येथील यात्रेसाठी आले होते. चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ््यातील अंदाजे ७० हजार रूपये किंमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची चैन लंपास केली. येडेश्वरी यात्रेतील चुन्याच्या शेतात येरमाळा येथे ही चोरीची घटना घडली. या प्रकरणी सुरेश फड यांनी दि.२५ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पोलीस ठाणे येथे ३७९ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा जि. धाराशिव आगारातील राज्य परिवहन महामंडळाचे बसचालक अयुब मकबुल नदाफ हे दि. २५ एप्रिल रोजी बस क्र एमएच २० बीएल २७०१ व बस क्र एमएच २० बीएल २६३० या दोन घेऊन येरमाळा येथील चुन्याच्या शेतात दि. २५ रोजी घेऊन मुक्कामासाठी थांबले होते. त्यावेळी चोरट्यांनी बसमधील अंदाजे ३६ हजार ९०० रूपये किंमतीचे ४१० लिटर डिझेल चोरुन नेले. या प्रकरणी बसचालक अयुब नदाफ यांनी दि.२५ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पोलीस ठाणे येथे ३७९ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

बार्शी जि. सोलापूर येथील केशरबाई माणिकराव घोलप ह्या येरमाळा येथे यात्रेसाठी आल्या होत्या. दि. २४ एप्रिल रोजी चुन्याच्या रानात येडेश्वरी देवी पालखीच्या विसावा कट्टा येथे दशर्नासाठी गेल्या होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या गळ््यातील पावणे दोन तोळ््याचे सोन्याचे गंठन लंपास केले. या प्रकरणी केशरबाई घोलप यांनी दि.२५ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पोलिस ठाणे येथे ३७९ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR