38.8 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रहातकणंगलेमध्ये राहुल आवाडेंच्या हाती मशाल

हातकणंगलेमध्ये राहुल आवाडेंच्या हाती मशाल

धैर्यशील माने, राजू शेट्टींसमोर तगडे आव्हान
कोल्हापूर : प्रतिनिधी
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर भाजपचे मित्रपक्ष असलेले ताराराणी आघाडीचे आमदार प्रकाशअण्णा आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांनी नाराज होऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश करण्यास नकार दिला. त्यामुळे बाहेरून पाठिंबा देण्याऐवजी मशाल चिन्हावर उमेदवार देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. त्यामुळे आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघात माने-शेट्टी-आवाडे अशी तिरंगी लढत होणार आहे.
इचलकरंजीचे आमदार प्रकाशअण्णा आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून लढण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे. कोल्हापूरचे शिवसेना संपर्क नेते संजय पवार यांच्याशी त्यांची भेट झाली. त्या भेटीत निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब झाले. उद्धव ठाकरे यांना लवकरच आवाडे भेटणार आहेत. आवाडे यांचा ताराराणी पक्ष हा भाजपचा मित्रपक्ष आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ते भाजपला बाहेरून पाठिंबा देतात. परंतु यंदाच्या लोकसभा उमेदवारीच्या चर्चेत विचारात घेतले नाही, अशी तीव्र नाराज व्यक्त करून स्वतंत्र निर्णय घेतल्याचे आवाडे यांनी सांगितले. दुसरीकडे ठाकरे गटाला देखील ताकदवान उमेदवार नसल्याने राहुल आवाडे यांच्या रूपाने ठाकरेंना मोठी ताकद मिळू शकते. राहुल आवाडे निवडणूक रिंगणात उतरल्यास राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांची डोकेदुखी वाढणार आहे.
आवाडे यांची मोठी ताकद
हातकणंगले मतदारसंघात आवाडे यांची मोठी ताकद आहे. तसेच महाविकास आघाडीचेही ३ आमदार हातकणंगले मतदारसंघात आहेत.इस्लामपूर, शिराळा तसेच हातकणंगलेमधून आवाडे यांच्यामागे ताकद उभी राहिल, असा कयास बांधला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR