राज्यात उष्णतेची लाट

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आल्याचे पहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांमधील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेच्या लाटेचा धोका लक्षात घेता नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व अधिकारी व कर्मचा-यांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्र हा उष्णतेच्या धोक्याच्या दृष्टीने संवेदनशील राज्यांपैकी एक असल्याने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारतीय हवामान विभाग तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या उपाययोजना करण्यात येणार आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्याचे पहायला मिळत आहे. जिल्ह्यात तापमानाचा पारा ४३.२ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. तापमान वाढल्यामुळे बाजारपेठ तसेच रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळत आहे. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या तेलंगणामधील चार जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मंचिर्याल, आदिलाबाद, निर्मल, भोपालपल्ली या चार जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जळगावात ४३ अंश सेल्सिअस तापमान
जळगाव जिल्ह्यासह चाळीसगाव तालुक्यात उष्णतेचा प्रचंड तडाखा जाणवत असून, चाळीसगावातील तापमानाने यावर्षी दुस-यांदा उच्चांक गाठत तब्बल ४३ अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली आहे. सकाळपासूनच कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या वेळेत उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होत आहेत. वाढत्या तापमानाचा फटका नागरिकांसह शेतकरी, मजूर आणि वाहनचालकांनाही बसत आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेता आरोग्य विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत बाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे आणि लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने देखील येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

अकोल्यात ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
अकोल्यात उष्णतेचा कहर पहायला मिळत आहे. तापमान ४६ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली असून, नागरिक डोक्यावर रुमाल, हातात छत्री घेऊनच बाहेर पडताना दिसत आहेत. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक काम असल्यासच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

वर्ध्यात पारा ४६ अंश सेल्सिअसवर
वर्धा जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा मोठा परिणाम पहायला मिळत आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. वर्धा जिल्ह्यात सलग दोन दिवस तब्बल ४६ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळत आहे. दरम्यान तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भाचे जिल्हानिहाय तापमान
अकोला : ४६.३ अंश सेल्सिअस, अमरावती – ४६.४, वर्धा- ४६.५, नागपूर- ४४.४, बुलडाणा- ४३.६, चंद्रपूर-४३.८, गोंदिया- ४३.८, गडचिरोली- ४३.६, यवतमाळ -४५.४ आणि वाशिममध्ये ४४.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
धर्माबाद तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
01:59
Video thumbnail
धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये क्रिकेटचा महाकुंभ; विलासराव देशमुख चॅम्पियनशिप २०२६..
02:56
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉक्टरांच्या मुलांसह मोटेगावकरांच्या मुलांसाठी खास क्लास ?CBI च्या चौकशीत उघड
01:49
Video thumbnail
BIG BREAKING : लातूरच्या नारायण नगर परिसरात CBI ची धडक;विद्यार्थ्याने नीट पेपर विकत घेतल्याचा संशय
01:48
Video thumbnail
टेंभुर्णीत भीषण आग! फर्निचर, हार्डवेअरसह इलेक्ट्रॉनिक्सची ३ दुकाने खाक; कोट्यवधींचे नुकसान
01:46
Video thumbnail
हिमायतनगर तालुक्यात पेट्रोल-डिझेलचा प्रचंड तुटवडा; शेतीची कामे रखडल्याने शेतकरी आक्रमक
03:18
Video thumbnail
ऑनलाईन औषध विक्रीविरोधात जळकोट तालुक्यात 'केमिस्ट'चा कडकडीत बंद; तहसीलदारांना निवेदन!
02:05
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|ED च्या रडारावर प्रा. शिवराज मोटेगावकरांची बेहिशोबी संपत्ती?
05:06
Video thumbnail
ब्रेकिंग : मोटेगावकरांच्या पत्नीला देखील CBI ची नोटीस
02:09
Video thumbnail
'लातूर पॅटर्न' : एका शैक्षणिक क्रांतीचा उगम, सुवर्णकाळ आणि बदलत्या प्रवासाचा अंतर्वेध
06:11
Video thumbnail
नांदेडमध्ये डिझेलचा तुटवडा; वाहनधारकांची परवड, तर जिल्हाधिकाऱ्यांचा 'पायी चालण्याचा' अजब सल्ला!
03:03
Video thumbnail
लातूर पॅटर्नवर पेपर फुटीचे सावट? ट्युशन एरियातून ग्राउंड रिपोर्ट!
08:41
Video thumbnail
BIG BREAKING : नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर, औसा रोड परिसरातील हॉस्पिटलमध्ये चौकशी सुरू!
02:38
Video thumbnail
NEET पेपरफुटीविरोधात माढ्यात युवक काँग्रेस आक्रमक; शाहूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन
01:16
Video thumbnail
Latur|नीट पेपर फुटी प्रकरणातील इनसाईड स्टोरी A to Z
09:46

Latest news