36.1 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeराष्ट्रीयरुग्णालये, छोट्या क्लिनिकमध्ये मोफत औषधे पुरवा

रुग्णालये, छोट्या क्लिनिकमध्ये मोफत औषधे पुरवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या कोठडीत आहेत. सध्या ते तुरुंगातून आपला कारभार पाहत आहेत. त्यासंबंधी त्यांनी एक आदेश दिला होता त्यातच आता आणखी एक आदेश केजरीवालांनी जारी केला आहे. यावेळी त्यांनी आरोग्य मंत्रालयाला सूचना दिल्या आहेत. दिल्लीतील आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की, मला आदेश मिळाले आहेत की मोहल्ला क्लिनिकमध्ये औषधे आणि चाचण्या मोफत दिल्या जाव्यात.

त्यांचा आदेश माझ्यासाठी देवाच्या आदेशासारखा आहे, असे त्यांनी म्हटले.
सौरभ भारद्वाज यांनी केजरीवाल यांच्या आदेशाविषयी माहिती दिली. दिल्लीतील लोकांना मोफत औषधे आणि मोफत चाचण्या मिळत राहाव्यात अशी अरविंद केजरीवाल यांची इच्छा आहे. त्यांनी सतत रुग्णालयांना भेटी देण्यास सांगितले. अरविंद केजरीवाल ईडीच्या कोठडीत असूनही त्यांना दिल्लीतील लोकांच्या आरोग्याची काळजी आहे.

याआधी अरविंद केजरीवाल यांनी २३ मार्च रोजी पहिला आदेश जारी केला होता. यामध्ये त्यांनी दिल्लीतील अनेक भागातील पिण्याच्या पाण्याची आणि गटारांची समस्या सोडवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, यावरूनही वाद सुरू झाला आहे. कोठडीत असताना मुख्यमंत्र्यांनी अशा सूचना देणे हे पीएमएलए कोर्टाने दिलेल्या आदेशाच्या कक्षेत येते का, याचा तपास ईडी करत आहे?

पहिल्या आदेशाची ईडीकडून चौकशी
दरम्यान, रिमांडमध्ये असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जारी केलेल्या सरकारी आदेशाची ईडीने दखल घेतली. अरविंद केजरीवाल कोठडीत असताना महत्त्वाच्या सरकारी कागदपत्रांवर स्वाक्षरी करू शकतात का? ते तुरुंगात असल्याने त्याला जेल मॅन्युअल पाळावे लागते. तुरुंगात त्यांना पेन किंवा कागद देता येणार नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR