32.4 C
Latur
Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्ररावेरमध्ये भाजपांतर्गत वाद चव्हाट्यावर

रावेरमध्ये भाजपांतर्गत वाद चव्हाट्यावर

रक्षा खडसेंच्या उमेदवारीवर पदाधिकारी नाराज

जळगाव : प्रतिनिधी
भाजपने जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळताच मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

काहींनी ही नाराजी उघडपणे बोलूनदेखील दाखवली आहे. आता जळगावच्या भाजपच्या अंतर्गत बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर रक्षा खडसे व पदाधिका-यांमध्ये मोठा वाद झाल्याचे समोर आले आहे. तसा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भाजपच्या अंतर्गत बैठकीत झालेल्या वादाचे व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. भाजप कार्यकर्त्यांना डावलले जात असून रक्षा खडसे भाजपच्या कार्यकर्त्यांना घेऊन फिरतात, असा आरोप पदाधिका-यांनी व कार्यकर्त्यांनी केला आहे. गिरीश महाजन यांच्यासमोरच हा सर्व प्रकार घडल्याने रावेर मतदारसंघातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

व्हायरल झालेल्या व्हीडीओत रक्षा खडसे आणि गिरीश महाजन यांच्यासमोरच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बसले आहेत. त्यावेळी त्यांनी रक्षा महाजन या एकनाथ खडसे यांचे नाव घेतात, गिरीश महाजन यांचे नाव का घेत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. भाजपच्या खासदार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांना जवळ केले जाते, असाही आरोप यावेळी करण्यात आला आहे. रक्षा खडसे आणि भाजप कार्यकर्त्यांमधील हा वाद सुरू असताना एकीकडे गिरीश महाजन दोघांनाही शांत करताना दिसत आहेत.

रक्षा खडसे यांचे स्पष्टीकरण
खडसे यांनी म्हटले आहे की, आता निवडणूक जाहीर झाली आहे. अशावेळी सर्वच पक्षांमध्ये असे छोटे-मोठे वाद होत असतात. मात्र गिरीशभाऊंनी सगळ्यांची बैठक घेऊन समजूत काढली आहे. माझ्या मते हा काही फार मोठा मुद्दा नाही. मात्र हा व्हीडीओ कोणी व्हायरल केला आणि त्यामागे त्यांचा काय उद्देश आहे, हे मला माहीत नाही. मी राष्ट्रवादीच्या लोकांना सोबत घेऊन काम केले असते तर पक्षाने उमेदवारीसाठी माझा विचार केला नसता

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR