41 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeलातूरशिरुर अनंतपाळ तालुक्यात पावसाच्या सरी

शिरुर अनंतपाळ तालुक्यात पावसाच्या सरी

शिरुर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यात विजेच्या कडकडाटासह ढगाळ वातावरण असून त्यात हलक्या प्रतिचा पाऊस पडल्याने शेतमाल व राशीच्या गंजीवर ताडपत्री टाकताना शेतक-यांंची मोठी धावपळ झाली .अशात वातावरण खराब होऊन दिवसा कडक ऊन्हाचा चटका तर रात्री थंड गारवा सुटल्याने रुग्णाच्या संख्येतही वाढ झाली आहे.

सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात रब्बी ज्वारी, गहू व हरभराच्या राशी सुरु आहेत तर त्यासोबत ऊसाचे गुु-हाळही सुरू आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणात रब्बी पिकाचा पेरा झाला असताना काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने हरभरा काढणीला वेळ लागला तर काही ठिकाणी शेतक-यांंनी स्वत:च हरभ-याच्या राशी केल्या. या नंतरही तालुक्यात मोठ्या प्रमाणात हरभरा काढणे शिल्लक असून अनेक ठिकाणी राशी सुरू आहेत.

दरम्यान शेतकरी राशी करण्यात व्यस्त असताना गेल्या दोन दिवसांपासून हवामान खात्याच्या अंदाजानूसार वातावरण बदलले आहे. अशात तालुक्यात हलका पाऊस पडला असल्याने शेतक-यांंची चांगलीच धावपळ झाली असून राशी झाकण्यासाठी व तयार माल सुरक्षीत ठिकाणी नेण्यासाठी धांदल उडाली आहे. सध्या विचीत्र वातावरण पहायला मिळत असून रात्री थंड वा-यासह हलका पाऊस तर दिवसा कडक उन्हाचा चटका अशी परिस्थिती असून या विचित्र वातावरणामुळे शेती काम करताना शेतकरी मात्र मेटाकुटीला आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR