39.2 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeलातूरनिलंगा येथे उद्योग वसाहतीतील गोदामास आग

निलंगा येथे उद्योग वसाहतीतील गोदामास आग

निलंगा : प्रतिनिधी
शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये एका मोठा गोडाऊनच्या परिसरात आग लागली परंतु अग्नीशामक दलाचे वाहन घटनास्थळी पोहचल्याने मोठा अनर्थ टळला आहे. निलंगा शहरातील एमआयडीसीत लातूर येथील व्यापा-यांच्या जागेवर वेअरहाऊसचे बांधकाम सुरू असून त्याच्या सभोवताली वाळलेले गवत व झाडे असून त्यास आग लागली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडचण असल्यामुळे ही आग खूप मोठ्या प्रमाणात दिसू लागली परिसरातील नागरिक घाबरून गेले. तर जिल्हा परिषद शिक्षक डी. के. सूर्यवंशी व पेंटर संजय पेटकर यांनी सदर माहिती नगरपरिषदेस देताच माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंंगाडे हे आग्निशामक दलाच्या गाडीसह घटनास्थळी दाखल झाले तसेच पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप राठोड, होमगार्ड उमाकांत सूर्यवंशी रवाना झाले. तात्काळ अग्निशामन दलाच्या गाडीमुळे ही आग विझविण्यात यश आले .त्यामुळे परिसरातील मोठे नुकसान टळले असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

या वेअरहाऊसला लागूनच अग्रवाल यांची डाळ मिल असून त्यात सुमारे सव्वा ते दीड कोटीचा माल आहे, त्याच्या शेजारी गॅस सिलेंडरचे गोडाऊन आहे वेळीच ही आग आटोक्यात आल्यामुळे पुढील होणारा अनर्थ टळला व वेअरहाऊस रिकामे असल्यामुळे नुकसान झाले नाही.या वेळी अग्निशामक दलाचे कर्मचारी इंजिनियर गंगाधर खरवडे, विशाल सांडूर,लक्ष्मण खराडे, नागेश तुरे आदी कर्मचा-यानी परिश्रमाने ही आग विझवली. रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत हा थरार सुरू होता. यावेळी परिसरातील नागरिक रितेश ईनानी, अनिल अग्रवाल, रवी अग्रवाल, पंत नाईक, अदीसह अनेक नागरिकांनी ही आग विझविण्यासाठी मदत केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR