अहमदपूर : प्रतिनिधी
आनंदवाडी येथील शेतक-यांसाठी खूप महत्त्वाचा असलेल्या पाणंद रस्त्याच्या कामाचा प्रश्न मार्गी लावत या तालुक्यातील शेतक-यांना पेरणी करणे, शेतातील उत्पादित माल आणण्यासाठी तालुक्यात रस्त्याचे जाळे विनणार असल्याचे प्रतिपादन सभापती सुरज पाटील यांनी केले. आनंदवाडी येथे शेत रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. सभापती सुरज पाटील म्हणाले की, या तालुक्यात बळीराजा पाणंद रस्ते, मातोश्री रस्ते , रोजगार हमी योजनेतील रस्ते तयार व्हावे यासाठी ग्रामपंचायतीकडून रस्त्याच्या मागणीसाठी ठराव पंचायत समितीकडे पाठविण्यात येत आहेत. या तालुक्यातील शेतक-यांना पेरणीला अडचण येऊ नये, शेतात पिकविलेला माल ट्रॅक्टर, ट्रक, टेंम्पो आदी वाहनातून घेऊन येण्यासाठी, शेतातून उसाची वाहने येण्यासाठी शेताला रस्ता असणे हे खुप महत्वाचे झाले आहे.
अडचणीच्या ठिकाणी शेताला जाण्यासाठी रस्ते होत असल्यामुळे शेतक-यांमध्ये खूपच समाधानाचे वातावरण पहायला मिळत असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, शेतक-यांनी रस्त्यासाठी सहकार्य करावे, होत असलेली शेत रस्ते शेतक-यांसाठी मोठी दळणवळणाची जीवन वाहिनी ठरणार असल्याचे ते म्हणाले. अनेक वर्षापासून अडचणींचा असलेला वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे. होत असलेला रस्ता हा मजबूत , टिकाऊ, व दर्जेदार व्हायला पाहिजे. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांचा हितासाठी रस्त्याचे जाळे तयार करण्यास आम्ही कार्यतत्पर असल्याचे सभापती पाटील यांनी सांगितले.
यावेळी उत्तमराव माने जि.प.समाज कल्याण सभापती, अजिक्य देशमुख जि.प. सदस्य हाडोळती, चिल्लरगे ग्रामसेवक, महेश हंबीर चेअरमन, बापूराव मोघेकर, संदीप पुसेवाड तलाठी, शरद पवार, अनिल पाटील, भिमाशंकर जाभाडे, नितिन हंबीर, श्रीपती पाटील, भिमराव गुडसुडे, चंद्रकांत कबीर, अॅड.आनंद जाधव उपस्थित होते. या क्रार्यक्रमासाठी बालाजी तोरणे, आमोल पाटील, वसंत कबीर, कमलाकर कळमगावे, नारायण तोरणे, नामदेव कबीर, जाफर साब शेख, श्रीपती पाटील, रमेश तोरणे, सुनील पाटील ,मौला सय्यद व समस्त गावकरी मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचलन अॅड.आनंद जाधव यांनी तर आभार बाबुराव मोघेकर यांनी मानले.

