38.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeसोलापूरठेव संरक्षणाला विरोध नाहीच परंतु अंशदानाला विरोध

ठेव संरक्षणाला विरोध नाहीच परंतु अंशदानाला विरोध

सोलापूर : जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनची नववी वार्षिक सर्वसाधारण सभा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष दिलीप पतंगे यांच्या अध्यक्षतेखाली होऊन अंशदानला पतसंस्थांचा शंभर टक्के विरोध असल्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

या सभेला पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी, मानद सचिव मालिकार्जुन केंदुळे, संचालक दामोदर देशमुख, रंगनाथ गुरव, संचालिका रोहिणी तडवळकर, अँड. भालचंद्र पटवर्धन, चंद्रकांत रमणशेट्टी, लेखापरीक्षक रविकिरण शेंडगे, संचालक विष्णु नागटिळक, मारुती बाबर, व्यवस्थापिका मीनाक्षी केंची आदी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीस सभा अध्यक्ष दिलीप पतंगे यांच्या व उपस्थित मान्यवरांच्याहस्ते भारत मातेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.अहवाल वाचन मीनाक्षी केंची यांनी केले. त्यानंतर विविध प्रश्नावर झालेल्या चर्चेत श्रीशैल बनशेट्टी, दामोदर देशमुख, मालिकार्जुन केंदुळे, रोहिणी तडवळकर, चंद्रकांत रमणशेट्टी, व्ही. के. नागटिळक, मारुती बाबर व पतसंस्थांचे प्रतींनिधी यांनी भाग घेतला. दिलीप पतंगे यांनी सभेस सविस्तर मार्गदर्शन केले व अनेक विषयांवर चर्चा केली.

उपस्थित प्रतींनिधीच्या प्रश्नाचे समाधान केले. या सभेत पुढील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. अंशदानाची वसूली कशासाठी हे स्पष्ट नाही. फेडरेशन/फेडरल संस्थाशी चर्चा केलेली नाही. हे अयोग्य व अन्यायकारक आहे. पतसंस्थाना शासकीय मदत तर नाहीच उलट अनेक बंधने घातली जात आहेत. अंशदान म्हणजे चांगल्या चालणाऱ्या संस्थांना दंड आहे का ? अंशदानाचे विनियोग कश्या प्रकारे करणार याची नियमावली नाही. अंशदान विमा संरक्षण भासवले जात आहे पण तसे बिलकुल नाही. ठेव संरक्षणाला विरोध नाहीच परंतु अंशदानाला विरोध आहे. पतसंस्थांचाही १००% विरोध कायम आहे. या ठरावाबरोबरच सभेचे सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR