34 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeराष्ट्रीयसंजीव भट यांना २० वर्षांची जेल

संजीव भट यांना २० वर्षांची जेल

ड्रग्ज पेरल्याप्रकरणी गुजरात कोर्टाचा दणका
बनासकांठा : वृत्तसंस्था
माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वकिलाला अडकवण्यासाठी ड्रग्ज पेरल्याप्रकरणी गुजरात कोर्टाने ही शिक्षा जाहीर केली. गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर शहरातील सत्र न्यायालयाने बुधवारी माजी भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी संजीव भट्ट यांना १९९६ च्या खटल्यात दोषी ठरवले. गुन्हेगारी प्रकरणात संजीव भट्ट यांची ही दुसरी शिक्षा आहे.

या अगोदर २०१९ मध्ये जामनगर कोर्टाने त्यांना कोठडीतील मृत्यू प्रकरणात दोषी ठरवले होते. बुधवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जेएन ठक्कर यांनी भट्ट यांना राजस्थानमधील वकिलाला खोट्या गुन्ह्यात अडकवल्या प्रकरणी दोषी ठरवले.संजीव भट्ट यांना २०१५ मध्ये भारतीय पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. त्यावेळी ते बनासकांठा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. जिल्हा पोलिसांनी राजस्थानचे वकील सुमेरसिंग राजपुरोहित यांना १९९६ मध्ये अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत अटक केली होती.

वकील राजपुरोहित राहत असलेल्या पालनपूर येथील हॉटेलच्या खोलीतून ड्रग्ज जप्त केल्याचा दावा जिल्हा पोलिसांनी केला होता. पण नंतर राजस्थान पोलिसांनी नंतर सांगितले की, बनासकांठा पोलिसांनी राजपुरोहितला राजस्थानातील पाली येथील वादग्रस्त संपत्ती हस्तांतरित करण्यासाठी दबाव आणण्यासाठी खोटे ठरवले होते.

पोलिसांनी तपासासाठी
घेतली होती कोर्टात धाव
माजी पोलिस निरीक्षक आयबी व्यास यांनी १९९९ मध्ये गुजरात उच्च न्यायालयात या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची विनंती केली होती. संजीव भट्ट यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने सप्टेंबर २०१८ मध्ये एनडीपीएस कायद्यांतर्गत अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अटक केली होती आणि तेव्हापासून ते पालनपूर सब जेलमध्ये आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR