35.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात कोयतेधारी टोळक्याचा पुन्हा राडा; तरुणावर हल्ला

पुण्यात कोयतेधारी टोळक्याचा पुन्हा राडा; तरुणावर हल्ला

पुणे : शहरात कोयतेधारी टोळक्याने गैरसमजुतीतून केबल टाकणा-या तरुणावर हल्ला केल्याची घटना मध्यरात्री घडली. या टोळक्याने आरडाओरडा करत शिवीगाळदेखील केली. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून, पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात प्रकाश राठोड (वय २१, रा. भोसरी) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २८ मार्च रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास ड्रॅगन चायनिजसमोर, अमेय अपार्टमेंट, डी. पी. रोड, औंध येथे घडली.

फिर्यादी तरुण आणि त्याचे मित्र इंटरनेटचा पुरवठा करणा-­या कंपनीत नोकरी करतात. ते कंपनीकडून केबल टाकण्याचीही कामे करतात. दरम्यान, ते औंधमधील डी. पी. रोडवर पहाटे साडेतीनच्या सुमारास केबल टाकण्याचे काम करत होते. यादरम्यान, अचानक चौघे जण हातात कोयते घेऊन त्याठिकाणी मोठमोठ्याने आरडाओरडा करत आले. फिर्यादींचा एक सहकारी केबल घेण्यासाठी जात असताना टोळक्याने विनाकारणच त्याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने डोक्यात व हातावर वार केले. त्यानंतर टोळके पसार झाले.

या घटनेत तरुण जखमी झाला आहे. पोलिसांनी शोध घेऊन चौघांना पकडले असून, चौकशीत दोघे अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे हे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR