30 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeअंतरराष्ट्रीयबस बोगद्याच्या भिंतीला धडकल्याने १४ ठार, ३७ जखमी

बस बोगद्याच्या भिंतीला धडकल्याने १४ ठार, ३७ जखमी

शांक्सी : उत्तर चीनच्या शांक्सी प्रांतात मंगळवारी प्रवासी बस बोगद्याच्या भिंतीवर आदळली, त्यात १४ जण ठार आणि ३७ जण जखमी झाले, असे चीनच्या राज्य माध्यमांनी बुधवारी सांगितले.

स्थानिक अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात दुपारी २:३७ वाजता हुबेई एक्स्प्रेसवेवर झाला. अनेक लोकांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

तसेच चीनच्या पूर्वेकडील झेजियांग प्रांतात असलेल्या ताईझोउ येथील व्यावसायिक शाळेत मंगळवारी एक कार गर्दीत घुसली. या अपघातात देखील तिघांचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत. ही घटना सकाळी ११:२० वाजता ताईझोउ व्होकेशनल आणि टेक्निकल कॉलेजमध्ये घडली. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे अहवालात म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR