१८०० औषधी दुकान विक्रेत्यांचा बंदमध्ये सहभाग

परभणी : ऑनलाईन औषधी विक्रीच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. विना प्रिस्क्रीप्शन व होमडिलीव्हरी औषध पुरविण्याची सेवा पूर्णत: बंद करण्यात यावी. जीएसआर ८१७ (इ), जीएसआर (इ) २२०ला तात्काळ वापस घेण्याच्या मागणीसाठी परभणी जिल्हा केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगीस्ट असोसिएशनच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. तसेच या विरोधात बुधवार, दि.२० रोजी पुकारलेल्या बंदमध्ये जिल्ह्यातील १८०० औषधी दुकान विक्रेत्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यामुळे शहरातील संपूर्ण औषधी दुकान बंद होते. त्यामुळे रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना मात्र औषधीसाठी धावपळ करण्याची वेळ आली.

या संदर्भात मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या निवेनात नमूद करण्यात आले आहे की, ऑनलाईन माध्यमातून मोठी सूट देऊन औषध विक्री करण्यात येत आहे. औषधांच्या किंमती आवश्यकतेपेक्षा कमी ठेवण्याच्या धोरणाला प्रतिबंध लावण्या यावा आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभुमीवर नागरिकांचे हीत आणि रूग्णांच्या सुरक्षेसाठी वरील मुद्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

परभणी जिल्हा केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगीस्ट असोसिएशनच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात पदाधिकारी, सदस्य, औषधी विक्रेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात संघटनेच्या पदाधिका-यांनी आपले मनोगत व्यक्त करीत ऑनलाईन औषधी विक्रीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. या संदर्भात प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष संजय मंत्री, सचिव सुर्यकांत हाके यांची स्वाक्षरी आहे.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
धर्माबाद तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
01:59
Video thumbnail
धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये क्रिकेटचा महाकुंभ; विलासराव देशमुख चॅम्पियनशिप २०२६..
02:56
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉक्टरांच्या मुलांसह मोटेगावकरांच्या मुलांसाठी खास क्लास ?CBI च्या चौकशीत उघड
01:49
Video thumbnail
BIG BREAKING : लातूरच्या नारायण नगर परिसरात CBI ची धडक;विद्यार्थ्याने नीट पेपर विकत घेतल्याचा संशय
01:48
Video thumbnail
टेंभुर्णीत भीषण आग! फर्निचर, हार्डवेअरसह इलेक्ट्रॉनिक्सची ३ दुकाने खाक; कोट्यवधींचे नुकसान
01:46
Video thumbnail
हिमायतनगर तालुक्यात पेट्रोल-डिझेलचा प्रचंड तुटवडा; शेतीची कामे रखडल्याने शेतकरी आक्रमक
03:18
Video thumbnail
ऑनलाईन औषध विक्रीविरोधात जळकोट तालुक्यात 'केमिस्ट'चा कडकडीत बंद; तहसीलदारांना निवेदन!
02:05
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|ED च्या रडारावर प्रा. शिवराज मोटेगावकरांची बेहिशोबी संपत्ती?
05:06
Video thumbnail
ब्रेकिंग : मोटेगावकरांच्या पत्नीला देखील CBI ची नोटीस
02:09
Video thumbnail
'लातूर पॅटर्न' : एका शैक्षणिक क्रांतीचा उगम, सुवर्णकाळ आणि बदलत्या प्रवासाचा अंतर्वेध
06:11
Video thumbnail
नांदेडमध्ये डिझेलचा तुटवडा; वाहनधारकांची परवड, तर जिल्हाधिकाऱ्यांचा 'पायी चालण्याचा' अजब सल्ला!
03:03
Video thumbnail
लातूर पॅटर्नवर पेपर फुटीचे सावट? ट्युशन एरियातून ग्राउंड रिपोर्ट!
08:41
Video thumbnail
BIG BREAKING : नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर, औसा रोड परिसरातील हॉस्पिटलमध्ये चौकशी सुरू!
02:38
Video thumbnail
NEET पेपरफुटीविरोधात माढ्यात युवक काँग्रेस आक्रमक; शाहूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन
01:16
Video thumbnail
Latur|नीट पेपर फुटी प्रकरणातील इनसाईड स्टोरी A to Z
09:46

Latest news