28.6 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्र४० हजारात एक लाखांच्या बनावट नोटा; ५०० च्या दोन नोटा बाकी वह्यांचे बंडल!

४० हजारात एक लाखांच्या बनावट नोटा; ५०० च्या दोन नोटा बाकी वह्यांचे बंडल!

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून बनावट नोटांच्या छापखान्याचा भांडाफोड

पुणे : पाचशे रुपयांच्या बनावट नोटांच्या छापखान्याचा पर्दाफाश पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला. प्रिंटिंग मशीन, पंचवीस लाखांच्या बनावट नोटा, करन्सी पेपर हे सगळे छाप्यात हाती लागले.

या प्रकरणाने गृह विभागाची झोप उडाली आहे. पाचशे रुपयांच्या बनावट नोटा सध्या पुण्याच्या बाजारात दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या काळाबाजाराचा पर्दाफाश पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला आहे. विशेष म्हणजे या नोटांची छपाई सुरु असतानाच पोलिसांनी छापा टाकला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय चलनातील नोटांमध्ये चमकणारी एक तार असली की ती नोट खरी मानली जाते. अगदी तशीच तार या बनावट नोटांमध्ये ही आहे. त्यासाठी लागणारा करन्सी पेपर या टोळीने थेट चीनवरून मागवला. अलीबाबा वेबसाईटवरून ही खरेदी करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले. पंचवीस लाखांच्या बनावट नोटा बाजारात आणण्यासाठी तयार होत्या. चाळीस हजार दिले की एक लाखांच्या बनावट नोटा देऊ करायचे. इतक्या खुलेपणाने हा काळाबाजार सुरु होता. सध्या बाजारात हुबेहूब दिसणा-या पाचशे रुपयांच्या नोटा आहेत तरी किती? याचाच छडा लावण्याचे आणि या टोळीच्या मुळाशी जाण्याचे आव्हान पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर आहे.

पाचशेच्या दोन नोटा, बाकी बंडल वह्यांचा
पुण्यातील एका तरुणाची अशीच फसवणूक झाली. एक लाखाच्या बदल्यात तीन लाख रुपये देतो, असे आमिष दाखवणा-याने त्यास सील पॅक बॉक्स दिला. वरती फक्त पाचशेच्या दोन नोटा होत्या. प्रत्यक्षात बॉक्स उघडला असता, आत वह्या निघाल्या अन पाचशेच्या दोन्ही नोटा ही बनावट असल्याचे लक्षात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR