40 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेनेचे ८ उमेदवार जाहीर

शिवसेनेचे ८ उमेदवार जाहीर

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. यामध्ये राहुल शेवाळे, संजय मंडलीक, सदाशिव लोखंडे, प्रतापराव जाधव, हेमंत पाटील यांच्या नावांचा समावेश आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या पहिल्या यादीमध्ये खुद्द श्रीकांत शिंदे यांचे नाव नाही. जाहीर केलेल्या यादीमधील सर्वजण हे विद्यमान खासदार आहेत.

बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी गुरुवारी बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना डावलून त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली.

संजय गायकवाड यांनी एक अर्ज अपक्ष तर एक अर्ज पक्षाकडून भरल्याची माहिती आहे. कार्यकर्ते आणि जनतेच्या आग्रहास्तव उमेदवारी अर्ज भरल्याचे त्यांनी सांगितले. परंतु आता पक्षाने पुन्हा विद्यमान आमदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी दिली आहे.

शिवसेनेचे आठ उमेदवार
राहुल शेवाळे (मुंबई दक्षिण मध्य), संजय मंडलीक (कोल्हापूर), सदाशिव लोखंडे (शिर्डी), प्रतापराव जाधव (बुलढाणा), हेमंत पाटील (हिंगोली), श्रीरंग बारणे (मावळ), राजू पारवे (रामटेक), धैर्यशील माने (हातकणंगले).

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR