33.9 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदेंमुळे मुंबईचे सुशोभीकरण वाढले

मुख्यमंत्री शिंदेंमुळे मुंबईचे सुशोभीकरण वाढले

मुंबई : वृत्तसंस्था
बॉलिवूड अभिनेता गोविंदा अहुजा याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशानंतर अभिनेता गोविंदा अहुजा यांने मुंबईतील विकासकामांवर प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले. तसेच, मुंबईतील चित्रपसृष्टीला जगातील सर्वोत्तम चित्रपटसृष्टी बनवण्यासाठी काम करण्याची इच्छा त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे व्यक्त केली.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान अभिनेता गोविंदा अहुजा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर अभिनेता गोविंदा अहुजा यांने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ‘कला आणि संस्कृती क्षेत्रातील महत्त्वाची असलेली आणि विशेषता मुंबईत असलेली चित्रपसृष्टी ही भविष्यात अव्वल स्थरावरून जाऊन पोहचू शकते. कारण चित्रपटसृष्टी ही मॉर्डन असून अगोदर ज्या मुंबईला आम्ही बघायचो, त्यापेक्षा आताची मुंबई खुप सुंदर दिसते आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईचं सुशोभीकरणं वाढले, कामांना गती मिळाली, प्रदूषण कमी होतं आहे. आता मुंबई फार सुंदर दिसत आहे. मुंबईत शिंदेंमुळे बदल दिसतो आहे. माझ्यावर शिवकृपा राहिली. बाळासाहेब यांची देखील आमच्या कृपा होती’, असे गोविंदा अहुजा म्हणाला.

मला मुंबईतील चित्रपसृष्टी जगातली सगळ्यात भारी चित्रपसृष्टी करण्यासाठी काम करायचे आहे. लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय मुख्यमंत्री घेतील. २००४ साली मी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात होतो. लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता तब्बल १० वर्षांनंतर म्हणजे २०२४ मध्ये मी पुन्हा राजकारणात आलो आहे. माझ्यावर ही छत्रपती शिवाजी महाराजांची झालेली कृपाच आहे. माझ्या आई-वडिलांचे यांचे शिवसेनेप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत चांगले संबंध होते’, असे गोविंदा अहुजा म्हणाला.

‘सध्या मी लोकांना पाहतो तेव्हा मला त्यांच्यात आनंदाचे वातावरण यला मिळते. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाहतो तेव्हा मला वाटते की, मागील ९ ते १० वर्षांत देशात जी काम आणि विकास झालेला आहे तो खूपच वेगळा आहे. हे पाहून मला अविश्वसनीय वाटतं. एकेकाळी आपण देशातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करायचो. पण आता त्या मानसिकतेतून आपण बाहेर आलो आहोत. बरेच बदल आपल्याला या देशात यला मिळत आहेत’, असेही गोविंदा अहुजा यांने सांगितले.

दरम्यान, बुधवारी रात्री अभिनेता गोंिवदा याने माजी आमदार कृष्णा हेगडे यांची भेट घेतली होती. गोंिवदाला राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा असल्याची कृष्णा हेगडे यांनी सांगितले होते. उत्तर पश्चिम मुंबई म्हणजेच वायव्य मुंबई लोकसभा जागेसाठी गोंिवदाच्या रूपात शिवसेनेकडून नवीन चेहरा उतरवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR