36.4 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeसोलापूरवनभवनाच्या आवारात वृक्षतोड

वनभवनाच्या आवारात वृक्षतोड

सोलापूर : वृक्षसंवर्धनचे काम करणाऱ्या वन विभागाच्या आवारातील काही झाडे तोडण्यात आली आहेत. याबाबत वनविभाग स्वतःच झाडे तोडत असेल तर सामान्य नागरिकांनी कोणाचा आदर्श घ्यावा, अशी प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींमधून व्यक्त होत आहे. विजापूर रस्त्यावरील वनभवनासमोरील अतिक्रमण नुकतेच हटविण्यात आले आहे. याठिकाणी वनशहीद कर्मचाऱ्यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. अतिक्रमण काढल्यानंतर निर्माण झालेल्या जागेवर हे स्मारक बांधण्यात येणार आहे.

अतिक्रमण मुक्त करण्यात आलेल्या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी सध्या वनभवनच्या सभोवती संरक्षक भिंत बांधण्याचे कामही सुरू आहे. वनभवनासमोर अनेक प्रकारचीझाडे आहेत. मात्र, जिथे शहिदांचे स्मारक उभा करायचे आहे तिथेच काही झाडे होती. मिळालेल्या माहितीनुसार तीन झाडे तोडण्यात आली आहेत. मात्र, वन विभागाने याल दुजोरा दिलेला नाही. केवळ बांधकामाच्या आड येणारे एक सुबाभळीचे झाडे तोडले असल्याचे सांगितले.एकच झाड बांधकामच्या आड येत असल्याने तोडण्यात आले आहे. याबाबत येत असल्य करण्यात आला असून, त्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे.असे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगीतले

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR