Homeराष्ट्रीयआसाममध्ये भारतातील सर्वात लांब भूकंपरोधक पूल तयार

आसाममध्ये भारतातील सर्वात लांब भूकंपरोधक पूल तयार

१०० वर्षे टिकेल, चीनला लागून असलेल्या सीमावर्ती भागांपर्यंत जाणार

गुवाहाटी : आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवर उत्तर आणि दक्षिण गुवाहाटीला जोडणारा पहिला ६-लेन एक्स्ट्राडोसेड पूल किंवा महासेतू तयार झाला आहे. हा पूल केवळ आसामसाठीच नव्हे, तर देशासाठीही खास आहे, कारण हा भारतातील सर्वात लांब एक्स्ट्राडोसेड पूल असेल.

हा पूल भूकंप-प्रतिरोधक तंत्रज्ञानाने डिझाइन केला आहे आणि त्याचे अंदाजित आयुष्य १०० वर्षे आहे. आसामचा हा प्रदेश भूकंप झोन-६ मध्ये येतो, त्यामुळे पुलामध्ये विशेष पेंडुलम प्रणाली बसवण्यात आली आहे, जी भूकंपाचे धक्के सहन करून त्यांना खाली सरकवते. एक्स्ट्राडोसेड पूल गर्डर आणि केबल या दोन्ही तंत्रज्ञानावर आधारित असतो. यामुळे तो पारंपरिक पुलांपेक्षा अधिक मजबूत आणि किफायतशीरही असतो. पुलाचे बांधकाम सुमारे ९९% पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच महिन्यात त्याचे उद्घाटन करतील अशी शक्यता आहे.

तमिळनाडूतील रामेश्वरम येथे आशियातील पहिला वर्टिकल लिफ्ट स्पॅन रेल्वे पूल (नवीन पंबन पूल) आहे. २.०८ किमी लांबीच्या या पुलाची पायाभरणी नोव्हेंबर २०१९ मध्ये करण्यात आली होती. २०२५ मध्ये त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. हा पूल रामेश्वरम (पंबन बेट) ला भारताच्या मुख्य भूमीवरील तमिळनाडूतील मंडपमशी जोडतो. भविष्याचा विचार करून, तो दुहेरी मार्गिका आणि हाय-स्पीड गाड्यांसाठी डिझाइन करण्यात आला आहे. स्टीलपासून बनवलेल्या या नवीन पुलावर पॉलिसिलोक्सेन कोटिंग करण्यात आले आहे, जे त्याला गंज आणि समुद्राच्या खा-या पाण्यापासून वाचवते.

५ मिनिटांत पूल वर उचलला जातो
जुना पंबन पूल २०२२ मध्ये गंज लागल्यामुळे बंद करण्यात आला होता. त्यानंतर रामेश्वरम आणि मंडपम दरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी संपुष्टात आली होती. नवीन पंबन पूल १०० स्पॅन म्हणजेच भागांनी मिळून बनवला आहे. जेव्हा समुद्रातील जहाजांना जायचे असते तेव्हा या नेव्हिगेशन पुलाचा (समुद्री जहाजांसाठी उघडणारा पूल) मध्यवर्ती स्पॅन (मधला भाग) वर उचलला जातो. हा इलेक्ट्रो-मेकॅनिकल प्रणालीवर काम करतो. यामुळे याचा मध्यवर्ती स्पॅन फक्त ५ मिनिटांत २२ मीटरपर्यंत वर उचलला जाऊ शकतो. यासाठी फक्त एका व्यक्तीची गरज असेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR