Homeलातूर‘मुंदडा इंडस्ट्रीज’ला भीषण आग; ३ होरपळले

‘मुंदडा इंडस्ट्रीज’ला भीषण आग; ३ होरपळले

भीषण दुर्घटना टळली आग आटोक्यात

लातूर : जुनी एमआयडीसी परिसरातील ‘मुंदडा इंडस्ट्रीज’(काच कारखाना)ला गुरूवार दि. १६ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ३:१५ च्या दरम्यान भीषण आग लागली असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट झाले आहे. तर या आगीत ३ कर्मचारी होरपळले असून त्यांना प्रथमोपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून २५ ते ३० गॅस सिलिंडर्सला आग नियंत्रण पथकातील जवानांनी इतरत्र सुरक्षीत हलविले. दरम्यान या आगीत तीन ते ४ स्फोट झाले असून ते गॅस सिलिंडरचे असल्याचे प्राथमिक अंदाज आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR