Homeराष्ट्रीयशांततापूर्ण आंदोलन लोकशाहीचा आत्मा

शांततापूर्ण आंदोलन लोकशाहीचा आत्मा

हा भारत आहे, उत्तर कोरिया नाही युवक काँग्रेस सदस्यांवरील कारवाईवर राहुल गांधींचा संताप

नवी दिल्ली : संसदेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडिया एक्सवर युथ काँग्रेस सदस्यांविरुद्धच्या कारवाईवरून पंतप्रधानांवर टीका केली. त्यांनी आपल्या पक्षाच्या युवा शाखेच्या सदस्यांविरुद्ध शर्टलेस आंदोलनासंदर्भात झालेल्या पोलिस कारवाईवर भाष्य केले.
ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार आणि उत्तर कोरियाचे हुकूमशाही शासन एकसारखे आहे. ते म्हणाले की, हे भारत आहे, उत्तर कोरिया नाही. राहुल म्हणाले की, शांततापूर्ण आंदोलन लोकशाहीचा आत्मा आहे. हा कोणताही गुन्हा नाही.

खरे तर, दिल्लीत आयोजित एआय समिटदरम्यान युवक काँग्रेसच्या सदस्यांनी शर्ट काढून निषेध केला होता. या संदर्भात दिल्ली पोलिस ३ सदस्यांना अटक करण्यासाठी शिमला येथे पोहोचली होती. त्यानंतर हिमाचल पोलिसांनी दिल्ली पोलिसांना त्यांना घेऊन जाण्यापासून रोखले होते. अटक केलेल्या तीन युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना दिल्लीत परत आणण्याची परवानगी मिळाल्यानंतर राहुल यांनी हे विधान केले. दिल्लीतील एआय परिषदेत अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केल्याच्या आरोपावरून ३ युवक काँग्रेस नेत्यांच्या अटकेवरून बुधवारी हिमाचल आणि दिल्ली पोलिसांमध्ये संघर्ष झाला.

दिल्ली पोलिसांनी शिमला येथील एका हॉटेलमधून मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील ३ नेत्यांना अटक केली, परंतु हिमाचल पोलिसांनी त्यांना अर्ध्या वाटेतच रोखले आणि दिल्लीला घेऊन जाण्यास मज्जाव केला. हिमाचल पोलिसांचे म्हणणे होते की, या संदर्भात दिल्ली पोलिसांनी कोणतीही औपचारिक माहिती दिली नाही. हिमाचलमध्ये साध्या वेशात येऊन पाहुण्यांना ताब्यात घेण्यात आले. न्यायालयात सुनावणीदरम्यानही दोन्ही पोलिसांमध्ये वाद होत राहिला. यानंतर न्यायाधीशांनी कागदपत्रे तयार करण्यास सांगितले असता, दिल्ली पोलिसांनी पुन्हा कोणतीही कागदोपत्री कारवाई न करता तिन्ही नेत्यांना घेऊन गेले.

काय म्हटले पोस्टमध्ये?
– विचार करा, मुद्दा कोणताही असो, जर तुम्ही सत्तेच्या विरोधात संवैधानिक मार्गाने आवाज उचललात, तर लाठीमार, खटला आणि तुरुंगवास, हे जवळजवळ निश्चित आहे. पेपरफुटीने त्रस्त झालेल्या तरुणांनी आपल्या भविष्यासाठी आवाज उचलला, उत्तर मिळाले लाठ्यांनी.

– देशातील गौरवशाली महिला कुस्तीपटूंनी भाजपच्या प्रभावशाली नेत्यावर लावलेल्या गंभीर आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. त्यांच्या हाकेला बदनाम करण्यात आले, आंदोलनाला चिरडले गेले आणि त्यांना रस्त्यांवरून जबरदस्तीने हटवण्यात आले.

– एका बलात्कार पीडितेच्या समर्थनार्थ इंडिया गेटवर शांततापूर्ण निदर्शने झाली. न्यायाच्या मागणीला व्यवस्थेसाठी गैरसोय मानून दूर करण्यात आले. युवा काँग्रेसने देशाचे नुकसान करणा-या वर ट्रेड डीलचा शांततापूर्ण विरोध केला, तेव्हा त्यांना देशद्रोही ठरवून अटक करण्यात आली.

– जेव्हा सामान्य लोक विषारी हवेविरुद्ध उभे राहिले, तेव्हा पर्यावरणाच्या चिंतेलाही राजकारण म्हणून दाबून टाकण्यात आले. जेव्हा शेतक-यांनी आपल्या हक्कांसाठी आंदोलन केले, तेव्हा त्यांना देशविरोधी ठरवण्यात आले. अश्रुधुराचे गोळे, रबरी गोळ्या, पाण्याचे फवारे आणि लाठ्या, हेच संवादाचे माध्यम बनले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR