Homeराष्ट्रीयलेन्सकार्टमधील ‘तिलक-हिजाब’ प्रकरण चिघळले

लेन्सकार्टमधील ‘तिलक-हिजाब’ प्रकरण चिघळले

धीरेंद्र शास्त्री म्हणाले तू लाहोरला जा महाराष्ट्र-मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये कंपनीला विरोध

भोपाळ : आयवेअर कंपनी लेन्सकार्टच्या ड्रेस कोडवरून वाद वाढला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडसह अनेक राज्यांमध्ये निदर्शने होत आहेत. हिंदू संघटनांशी संबंधित लोक गेल्या ४ दिवसांपासून या राज्यांमधील अनेक शहरांमधील लेन्सकार्ट स्टोअरमध्ये जाऊन कर्मचा-यांना टिळा लावत आहेत आणि कलावा बांधत आहेत.

यादरम्यान, बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी कंपनीच्या प्रवर्तकांना सांगितले, ‘तू आपली कंपनी लाहोरमध्ये उघड, भारतात कशाला मरतो आहेस? हा तुझ्या काकाचा भारत आहे का? होय! हा आमच्या बापाचा भारत आहे. खरं तर, गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर कंपनीचा एक धोरणात्मक दस्तऐवज व्हायरल झाला होता. यात कर्मचा-यांना टिकली, टिळा आणि कलावा घालण्यावर बंदी घालण्यात आली होती. हिजाब आणि पगडीला काही अटींसह परवानगी देण्यात आली होती.

भोपाळमधील न्यू मार्केट येथील लेन्सकार्ट स्टोअरबाहेर हिंदू उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. कार्यकर्त्यांनी कर्मचा-यांना टिळा लावला. मंत्रोच्चारासह कलावा बांधला आणि घोषणा दिल्या. हिंदू उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर तिवारी म्हणाले की, हा हिंदुस्तान आहे, येथे टिळा, कलावा आणि टिकलीचा सन्मान व्हायला हवा. जर कंपनीने यावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला, तर ते सहन केले जाणार नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR