Homeमहाराष्ट्रशिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत वाद उफाळला

शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत वाद उफाळला

खोपोलीत शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

खोपोली : प्रतिनिधी
साता-यानंतर खोपोलीतही शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आला असून शिवसैनिकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी खोपोलीत योग्य फिल्डिंग लावत थोरवे यांच्या जवळचे लोक फोडले. शिवसेनेतील अंतर्गत नाराजीचा फायदा उचलत शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.

शिवसैनिकांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशामुळे आमदार थोरवेंसह एकनाथ शिंदेंना जबर धक्का बसला आहे. आमदार थोरवे सतत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेंवर टीका करतात. आता सुधाकर घारे यांनी आमदारांच्या मतदारसंघातच महेंद्र थोरवे यांचाच करेक्ट कार्यक्रम केला आहे. शिवसैनिकांच्या पक्षप्रवेशावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील पाटील, तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे, कर्जतचे तालुकाध्यक्ष दीपक श्रीखंडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेकडून नगरसेवकपदाची निवडणूक लढवून पराभूत झालेल्या काही उमेदवारांसह प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. खासदार तटकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आहे. तर या प्रवेशासाठी सुधाकर घारे यांनी प्रवेशासाठी फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे.

यासह नगरपालिकेची निवडणूक जिंकल्यानंतर शिवसेना शिंदे गटात अंतर्गत वाद होऊ लागले. यामुळे महेंद्र थोरवे यांच्या जवळच्या सहका-यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. हा प्रवेश आता थोरवे यांच्यासह शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान सुधाकर घारे यांनी विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. या निवडणुकीत सुधाकर घारे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतरच सुधाकर घारे यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कंबर कसली होती. पण तेथेही त्यांना यश आले नाही. ज्यानंतर त्यांनी खोपोलीकडे पक्षबांधणी आणि पक्ष प्रचारावर भर दिला. आता त्यांनी थेट मित्र पक्ष असणा-या शिंदेंच्या शिवसेनेलाच सुरुंग लावला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR